सोमवार, १२ मे २०२५. वैशाख पौर्णिमा. उत्तरायण, शके १९४७. संवत २०८१. विश्वावसुनाम संवत्सर. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)
राहुकाळ - सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
"आज विशाखा वर्ज्य दिवस आहे" बुद्ध पौर्णिमा, वैशाख स्नान समाप्ती
चंद्रनक्षत्र - स्वाती/ (सकाळी ६.१७ नंतर) विशाखा. आज जन्मलेल्या बाळाची राशी - तुळ. (विष्टी करण शांती)
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या फेसबुक पेजला भेट द्या.
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) रवी प्रतियुती चंद्र आहे. आत्मविश्वास वाढेल. सरकारी कामाला वेग येईल. धाडस दाखवाल. सन्मान मिळतील. मात्र पत्नी नाराज होऊ शकते.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) व्यापार आणि खर्च दोन्हीही वाढेल. मन आनंदी राहील. संपत्ती वाढेल. यश मिळेल. कामात व्यस्त राहाल.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) कामाचे नियोजन बदलेल. अधिकार वाढतील. अध्यात्मिक लाभ होतील. दबदबा वाढेल.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) जमीन खरेदी लांबणीवर पडेल. गृह सजावट कराल. धन संपत्ती वाढेल. शेतीतून लाभ होतील.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) आर्थिक लाभ होतील. व्यवसायात वाढ होईल. बुद्धिमान वर्तुळात वावर वाढेल. मन आनंदी राहील.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) अनुकूल ग्रहमान आहे. नोकरी/वावसायच्या ठिकाणी मनासारखी कामे होतील. मौल्यवान खरेदी कराल. काहीसा मनस्ताप होऊ शकतो.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) अनुकूल ग्रहमान आहे. आत्मविश्वास वाढेल. दूरचे प्रवास होतील. उच्च शिक्षणात यश मिळेल. शत्रू शिरजोर होतील. सरकारी कायदे कटाक्षाने पाळा.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) संमिश्र दिवस आहे. काही सुखद अनुभव येतील. खर्चात वाढ संभवते.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) अनुकूल दिवस आहे. मनासारखी कामे होतील. नात्यातून लाभ होतील. तरीही काहीशी कमतरता जाणवेल. मन अस्वस्थ राहील.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) गुप्त शत्रूंचा त्रास जाणवेल. नवीन संधी चालून येतील. वारसा हक्काचे प्रश्न सुटतील. कामाचा ताण वाढेल.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) नवम स्थानी चंद्र आहे. प्रिय व्यक्तीची भेट होईल. सहल घडेल. मानसिक स्थिती चांगली राहील.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) संमिश्र दिवस आहे. अष्टम स्थानी चंद्र आहे. नेहमीची कामे चालू ठेवा. सामाजिक क्षेत्रातून त्रास होऊ शकतो.
- सायन ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521