असा असेल तुमचा आजचा दिवस राशिभविष्य २१ मार्च

असा असेल तुमचा आजचा दिवस राशिभविष्य २१ मार्च
  • Positive News
  • मार्च 21 2025

Share on  

२१ मार्च २०२५. फाल्गुन कृष्ण सप्तमी. वसंत ऋतू, क्रोधीनाम संवत्सर. शके १९४६, संवत २०८१. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)

राहुकाळ - सकाळी १०.३० ते दुपारी १२.०० 

आज वर्ज्य दिवस आहे.  

 चंद्रनक्षत्र - ज्येष्ठा.  आज जन्मलेल्या बाळाची राशी - वृश्चिक. (विष्टी करण शांती)

टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्र - शनी केंद्र योग आहे  प्रतिकूल ग्रहमान आहे. अध्यात्मिक प्रगती होईल.  अंतर्मुख व्हाल. मोठे करार आज नकोत.
     
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) 
संमिश्र दिवस आहे. प्रतिस्पर्धी तुमच्यावर मात करेन. कोर्टात मनासारखी बातमी येणार नाही. नोकरीच्या ठिकाणी संयम आवश्यक आहे. 
 
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) संमिश्र दिवस आहे. आर्थिक लाभ होतील. प्रिय व्यक्तीचे सान्निध्य लाभेल. प्रवासाचे नियोजन बदलेल.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) चांगला दिवस आहे. अपेक्षे इतकी नसली तरी गुंतवणूक पुरेसा लाभ मिळवून देईल. कायदेशीर कामे करा. अन्यथा परिणामाना सामोरे जावे लागेल.  
 
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) संमिश्र दिवस आहे. एखादी चांगली बातमी समजेल. प्रवास कार्यसाधक होतील. पत्नीची काळजी घ्यावी लागेल.
  
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) आर्थिक प्रगती चांगली होणार आहे. अनुकूलता वाढेल. जेष्ठ व्यक्तींबाबत चांगली बातमी समजेल. आरोग्यात सुधारणा होईल.
 
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) संमिश्र दिवस आहे.  प्रिय व्यक्तीसाठी वेळ द्याल. आर्थिक प्रगती होईल. प्रेमात अपयश येईन. 
 
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु)  संमिश्र दिवस आहे. कुटुंबासाठी वेळ द्यावा लागेल. वारसा हक्काचे प्रश्न सुटतील. घरगुती कटकटिना सामोरे जावे लागेल. सामाजिक कार्यातून मनस्ताप होईल.
 
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) दिवस फारसा अनुकूल नाही. महत्वाचे निर्णय टाळावेत. मोठे करार आज नकोत. लेखकांनी काळजी घ्यावी. नात्यात गैरसमज संभवतात. 
  
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) कौटुंबिक कामात वेळ जाईल. स्वप्ने साकार होतील. कामाची गती  संथ असेल. बोलताना कळजी घ्या.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) अनुकूल दिवस आहे. दशम स्थानी चंद्र आहे. मात्र उद्योग/ व्यवसायात  अडचणी निर्माण होऊ शकतात. नोकरीच्या ठिकाणी अप्रिय अनुभव येऊ शकतात.  
 
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) प्रवासाचे नियोजन बदलेल. अडचणी येऊ शकतात. प्रेमात फसवणूक होऊ शकते. अप्रिय घटना घडतील. खर्च वाढेल. 

(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी -  8087520521)

संबंधित बातम्या