असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य ८ मे

असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य ८ मे
  • Positive News
  • मे 8 2025

Share on  

गुरुवार, ८ मे २०२५. वैशाख शुक्ल एकादशी/द्वादशी. सौर ग्रीष्म ऋतू. उत्तरायण, विश्वावसुनाम संवत्सर, शके १९४७, संवत २०८१. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)

राहुकाळ - दुपारी १.३० ते दुपारी ३.०० 

"आज दुपारी १२.०० नंतर चांगला दिवस आहे" मोहिनी एकादशी

नक्षत्र - उत्तरा (फाल्गुना)/ हस्त. आज जन्मलेल्या बाळाची राशी - कन्या. (विष्टी करण शांती)

टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्र प्रतियुती शुक्र, शनी, नेपच्यून आहे. संमिश्र ग्रहमान आहे. सरकारी कामात दिरंगाई जाणवेल. प्रतिष्ठा पणास लागेल. नात्यात विनाकारण गैरसमज होऊ शकतात. आरोग्य सांभाळा.
     
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) फारशी अनुकूलता नाही. खरेदी होईल. आनंदी राहाल. गुंतवणुकीतून यश मिळेल. मात्र मोठे निर्णय आज नकोत. 

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) संमिश्र दिवस आहे. क्रोधावर नियंत्रण ठेवावे लागेल. कठोर भूमिका घ्याल. आरोग्य सांभाळावी लागेल. 

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) आर्थिक फायदा होईल. व्यापारात वृद्धी होईल. मात्र प्रवासात नुकसान संभवते.
 
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) दिवसाची सुरुवात चांगली होणार आहे. मात्र कलाकारांना अपेक्षित यश मिळणार नाही. व्यसने कटाक्षाने टाळा. मोठी जोखीम घेऊ नका.
  
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) संमिश्र दिवस आहे. व्यवसायात वाढ होईल. सुखे मिळतील. प्रिय व्यक्तीशी वाद होऊ शकतात. स्पर्धेत तडजोड करावी लागेल.
 
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) प्रतिकूल ग्रहमान आहे. शक्यतो आराम करावा. पाण्यापासून काळजी घ्या. विनाकारण कोणत्याही वादात भाग घेऊ नये.
  
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) एकादश स्थानी चंद्र आहे. प्रसन्न राहाल. मानसिकता चांगली राहील. मात्र विशेष लाभ मिळणार नाहीत. 
 
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) फारसा आशादायक दिवस नाही. मात्र नोकरी/व्यवसायात चांगले अनुभव येतील. सहकाऱ्यांची उत्तम साथ लाभेल.  
 
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) संमिश्र दिवस आहे. नाईलाजाने प्रवास करावा लागेल. अनामिक चिंता जाणवतील.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) आज मोठे निर्णय घेऊ नयेत. अंगात आळस असणार आहे. प्रकृतीची काळजी घ्या. 
  
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) अडचणी काहीशा दूर होऊ लागतील. व्यावसायिक प्रगती होईल. विरोधक काहीसे नरमाईने वागतील.   

- ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521.

संबंधित बातम्या