बुधवार, ७ मे २०२५. वैशाख शुक्ल दशमी/एकादशी. सौर ग्रीष्म ऋतू, उत्तरायण, शके १९४७, संवत २०८१, विश्वावसुनाम संवत्सर. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)
राहुकाळ - दुपारी १२.०० ते दुपारी १.३०
आज चांगला दिवस आहे.
चंद्रनक्षत्र - पूर्वा/उत्तरा. आज जन्मलेल्या बाळाची राशी - सिंह. (व्याघात योग)
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्राचा रवीशी त्रिकोण योग तर गुरूशी केंद्र योग आहे. पंचम स्थानी चंद्र आहे. चांगली बातमी मिळेल. अचानक लाभ होतील. सरकार दरबारी अडलेली कामे होतील. मात्र कर्जे घेऊ नका.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) मन धार्मिक विचारांनी भरून जाईल. सामाजिक कार्य कराल.
कामाचा ताण कमी होईल. मात्र खर्च वाढू शकतो.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) उद्योग/व्यवसायासाठी चांगला कालावधी आहे. आनंदी राहाल. अनुकूल रवी तुम्हाला यश देईन.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) संमिश्र दिवस आहे. काही सुखद अनुभव येतील. सिद्धी प्राप्त होतील. दुसऱ्याच्या मनातील अचूक ओळखु शकाल.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) तुमच्याच राशीत चंद्र आहे. अचानक लाभ होतील. नवीन संधी चालून येतील. जोडीदाराची नाराजी दूर करावी लागेल.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) फारशी अनुकूलता नाही. संयम ठेवावा लागेल. अधिकारात वाढ होईल. मोठी जोखीम आज घेऊ नका.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) अनुकूल दिवस आहे. भागीदारी व्यवसायात यश मिळेल. शत्रू पराभूत होतील. पराक्रम गाजवाल. अडचणीतून मार्ग सापडेल.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) अनुकूल ग्रहमान आहे. विजयश्री खेचून आणाल. प्रतिष्ठा वाढेल. नोकरीच्या ठिकाणी सुखद अनुभव येतील.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) धर्म कार्य कराल. नावलौकिक वाढेल. पर्यटन कराल. अचानक लाभ होतील. मात्र खर्च वाढतील.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) संमिश्र दिवस आहे. रवी आणि गुरू अनुकूल आहेत. सौख्य लाभेल. अनेक दिवसांपासून बाकी असलेल्या इच्छा पूर्ण होतील.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) सप्तम स्थानी चंद्र आहे. स्पर्धेत यश मिळेल. नात्यातून लाभ होतील. प्रिय व्यक्तीची नाराजी ओढवून घेऊ नका. खर्च वाढले तरी आवक देखील वाढणार आहे.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) आर्थिक लाभ होतील मात्र भय निर्माण करणाऱ्या घटना घडतील. सरकार दरबारी तुमचे वजन असल्याने त्यातून निभावून जाल. विनाकारण मोठेपणा मिरवू नका. शनीची नाराजी जाणवेल.
- ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521