असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य ५ मे

असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य ५ मे
  • Positive News
  • मे 5 2025

Share on  

सोमवार, ५ मे २०२५. वैशाख शुक्ल अष्टमी/नवमी. विश्वावसुनाम संवत्सर. शके १९४७, संवत २०८१. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)

राहुकाळ - सकाळी ७.३० ते सकाळी ९.०० 

"आज चांगला दिवस आहे"  दुर्गाष्टमी 

चंद्रनक्षत्र - आश्लेषा/(दुपारी २.०१ नंतर) मघा. आज जन्मलेल्या बाळाची राशी -  कर्क/सिंह. 

टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या फेसबुक पेजला भेट द्या.

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ)  चंद्राचा बुधाशी त्रिकोण , गुरुशी लाभ योग आहे.  सामाजिक कार्यातून लाभ होतील. नावलौकिक वाढेल. मानसिक क्लेश कमी होतील. धैर्य वाढेल.
       
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) तुमच्या राशीतील हर्षलशी चंद्राचा दुपारनंतर केंद्र योग होणार आहे. सकाळच्या सत्रात महत्वाची कामे पूर्ण करा. व्यवसाय वाढेल. प्रगती साध्य होईल.  
 
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) अनुकूल बुध, रवी उत्साह प्रदान करतील. बौद्धिक क्षेत्रात चमक दाखवाल. वक्तृत्व चमकेल.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) तुमच्याच राशीत सकाळी चंद्र आहे. काही अडचणी दूर होतील. स्वप्ने पूर्ण होतील. दिवस सत्करणी लावा. प्रवास घडतील.
    
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) संमिश्र दिवस आहे. व्यय स्थानी चंद्र आहे. आध्यत्मिक लाभ होतील.  नोकरीच्या ठिकाणी कटू अनुभव येऊ शकतात.
  
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) सकाळच्या सत्रात अनुकूल ग्रहमान आहे. आर्थिक लाभ होतील. प्रतिष्ठा जपण्यासाठी खर्च करावा लागेल. 

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) आर्थिक लाभ होतील. नोकरीत नवीन संधी मिळतील.  कामानिमित्त प्रवास घडतील. सुसंवाद वाढेल. अष्टम स्थानी हर्षल आहे. काळजी घ्या.
   
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) अनुकूल चंद्र आहे. स्पर्धेत यश मिळेल. भौतिक सुखाचा आनंद घ्याल. गूढ उलगडतील. शत्रूचा त्रास जाणवेल.
 
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) संमिश्र दिवस आहे. सुरुवात फारशी चांगली नाही. उत्तरार्ध अनुकूल आहे. पत्नीची काळजी घ्या. दानधर्म करण्यास उत्तम दिवस आहे.  
 
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) संमिश्र दिवस आहे. जुने वाद मिटवा. संयमाची भूमिका घ्या. प्रेमात अपयश संभवते. शेअर्स मध्ये जपून पावले टाका.
 
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) आर्थिक लाभ होतील. शेतीतून उत्तम फायदा होऊ शकतो. व्यवसाय वाढेल. घरगुती कटकटिना सामोरे जावे लागू शकते.
 
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) पंचम आणि षष्ठ चंद्र आहे. आर्थिक लाभ होतील. स्पर्धेत यश मिळेल. छोटे प्रवास घडतील. गैरसमज टाळा.

 - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521.

संबंधित बातम्या