असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य ३ मे

असा असेल तुमचा आजचा दिवस  : राशिभविष्य ३ मे
  • Positive News
  • मे 3 2025

Share on  

शनिवार, ३ मे २०२५. वैशाख शुक्ल षष्ठी. वसंत/ग्रीष्म ऋतू. शके १९४७, संवत २०८१. विश्वावसुनाम संवत्सर. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)

राहुकाळ - सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०

"आज चांगला दिवस आहे" गंगोत्पत्ती, गंगापूजन

चंद्र नक्षत्र - पुनर्वसू/ (रात्री १२.३४ नंतर ) पुष्य. आज जन्मलेल्या बाळाची राशी - मिथुन/ (सकाळी ६.३७ नंतर) कर्क. (बाळाची शूल योग शांती)

टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या  फेसबुक पेजला भेट द्या.

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्राचा शुक्र, शनी, नेपच्यूनशी त्रिकोण (शुभ) योग आहेत. हर्षल शी लाभ योग तर मंगळाशी युती आहे. व्यवसायात वाढ होईल. आर्थिक लाभ होतील. कामे पूर्ण होतील. अधिकार गाजवाल.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) व्यवसाय वाढीसाठी उत्तम कालावधी आहे. दानधर्म करा. चांगल्या संधी चालून येतील.
 
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) अनुकूल दिवस आहे. नोकरीतील अनुभवाचा फायदा होईल. चिंता नको. कठोर बोलणे टाळा.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) संमिश्र दिवस आहे. सकाळी व्यय स्थानी चंद्र आहे. वादविवाद टाळा. खर्चात वाढ होऊ शकते. संध्याकाळ आनंदाची. 

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) संमिश्र ग्रहमान आहे. सकाळच्या सत्रात अर्थप्राप्ती होईल. कामे पूर्ण करा. गरजूना मदत करा. संध्याकाळ खर्चात टाकणारी असू शकते.
  
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) तुमच्या कडून अपेक्षा वाढतील. मोठी गुंतवणुक करू शकतात. फायदा होईल. व्यावसायिक प्रतिस्पर्धी शरण येतील. 
 
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) स्थावर संपत्ती बाबत काही मार्ग निघू शकतात.  व्यावसायिक जागेत बदल संभवतो. कामाचा ताण वाढेल. मन आनंदी राहील.
 
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु)  संमिश्र ग्रहमान आहे. काही सुखद समाचार मिळतील. नावलौकिक वाढेल. मात्र अनैतिक कामे टाळा.  

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) संमिश्र दिवस आहे. मन उत्साही राहील. आर्थिक चिंता मिटतील. व्यावसायिकांना संधी दिसतील मात्र त्याचा आज लगेचच लाभ होणार नाही.
   
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) संमिश्र ग्रहमान असले तरी मन आनंदी राहील. सौख्य लाभेल. व्यवसाय वाढेल. अर्थकारण मजबूत होईल. 

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) अनुकूल दिवस आहे. दिवसभरात महत्वाची कामे पूर्ण करा. आत्मविश्वास वाढेल. दबदबा राहील. वाहन जपुन चालवा. 
  
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) ग्रहमान अनुकूल आहे. व्यापारात लाभ होतील. मात्र नियोजन बदलेल. छोटे प्रवास घडतील. अचानक फायदा होईल.

(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी -  8087520521)

संबंधित बातम्या