शुक्रवार, २ मे २०२५. वैशाख शुक्ल पंचमी. विश्वावसुनाम संवत्सर. शके १९४७, सनावत २०८१. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)
राहुकाळ - सकाळी १०.३० ते दुपारी १२.०० (भारतीय प्रमाण वेळेनुसार)
"आज चांगला दिवस आहे" श्री. आद्य शंकराचार्य जयंती श्री रामनुजाचार्य जयंती. घबाड दुपारी १.०४ नंतर.
चंद्र नक्षत्र - आर्द्रा/ (दुपारी १.०४ नंतर) पुनर्वसू. आज जन्मलेल्या बाळाची राशी - मिथुन.
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्र लाभ रवी आहे. चंद्राचा बुधाशी केंद्र योग आहे. व्यापार वाढेल. दीर्घकालीन गुणवतणुकीसाठी अनुकूल दिवस आहे. मात्र योग्य प्रकारे गणित करा.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) नोकरीत मनासारखे काम होईल. सहकार्य मिळेल. मन पवित्र विचारांनी भरून जाईन. बोलताना काळजी घ्या.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) तुमच्याच राशीत चंद्र आहे. आर्थिक आवक चांगली होईल. मान सन्मान मिळतील. उच्च शिक्षणात यश मिळेल.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) संमिश्र दिवस आहे. चंद्राची अनुकूलता नाही. प्राणायाम आणि ध्यानधारणा करा. नम्र रहा. वरिष्ठ नाराज होऊ शकतात.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) अनुकूल दिवस आहे. व्यावसायिक क्षेत्रात प्राबल्य गाजवाल. भ्रमंती घडेल. मात्र त्यात काळजी घ्या. स्वप्ने साकार होतील.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) दशम स्थानी चंद्र आहे. उत्तम आर्थिक लाभ होतील. नोकरी निमित्त प्रवास करावा लागेल. व्यावसायिक क्षेत्रात यश मिळेल.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) अनुकूल दिवस आहे. व्यावसायिक लाभ होतील. अडचणी दूर होतील. शत्रू पराभूत होतील.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) संमिश्र दिवस आहे. नोकरीच्या ठिकाणी सुखद अनुभव येतील. गुंतवणूक करताना काळजी घ्या. शत्रूभय आहे.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) चांगला दिवस आहे. पत्नीची संपत्ती वाढेल. आर्थिक लाभ होतील. येणी वसूल होतील.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) संशोधन आणि चिकित्सा क्षेत्रात यश मिळेल. मोठी आर्थिक उलाढाल होईल. आरोग्याची काळजी घ्या.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) अनुकूल ग्रहमान आहे. तुमच्या प्रयत्नांना बळ लाभेल. आप्तांची नाराजी दूर होईल. प्रवास घडतील.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) अनुकूल दिवस आहे. गृह कामासाठी खर्च कराल. धार्मिक कार्य घडेल. संभ्रम निर्माण करणाऱ्या काही घटना घडू शकतात.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी - 8087520521)