असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य ११ मे

असा असेल तुमचा आजचा दिवस :  राशिभविष्य ११ मे
  • Positive News
  • मे 11 2025

Share on  

रविवार, ११ मे २०२५. वैशाख शुक्ल चतुर्दशी/पौर्णिमा.  विश्वावसुनाम संवत्सर. शके १९४७, संवत २०८१. वसंत ऋतू. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)

राहुकाळ - दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००

"आज व्यतिपात, वर्ज्य दिवस आहे" श्री. नृसिंह जयंती

नक्षत्र: स्वाती. आज जन्मलेल्या बाळाची राशी- तुळ. (व्यतिपात योगाची शांती करून घेणे)

टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्राचा मंगळाशी केंद्र योग आहे. संमिश्र दिवस आहे. धाडसी निर्णय घ्याल. पराक्रम गाजवाल. मात्र घरात किंवा परिसरात कटकटींचा सामना करावा लागेल. 
     
वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) षष्ठ स्थानी चंद्र आहे. व्यवसाय ववाढेल. काही सुखद घटना घडतील. आर्थिक लाभ उत्तम होतील. मात्र अपेक्षित यश मिळणार नाही.  
 
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) अनुकूल दिवस आहे. स्वप्ने साकार होतील. आर्थिक तरतूद होईल. मोठी जोखीम नको. विनाकारण कटकटीं टाळा.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) उद्योग/व्यवसायात भरघोस वाढ होईल. जमीन व्यवहारात लाभ होतील. वाहन सुख लाभेल. प्रवास घडेल. मात्र फार मोठी जोखीम घेऊ नका. 
 
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) तृतीय स्थानी चंद्र आहे. मात्र व्यय स्थानातील मंगळ अनुकूल नाही. अधिकार वाढतील. सामाजिक वजन वाढेल. मात्र खर्चात देखील वाढ होणार आहे.
  
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) काही चांगले अनुभव येतील. कामात प्रगती होईल. कलाकारांना संधी मिळतील. पैशांची तजवीज होईल. 

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) अनुकूल ग्रहमान आहे. तुमच्याच राशीत चंद्र आहे. काहीसे सुखद अनुभव येतील. मन आनंदी राहील. वरिष्ठ मात्र नाराज होतील.
 
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) संमिश्र दिवस आहे. कामाचे नियोजन जमणार नाही. जमीन व्यवहार पुढे ढकलले जातील. अपेक्षाभंग होऊ शकतो. 

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) अनुकूल चंद्र आहे. मनासारखी कामे होतील. स्वप्ने साकार होतील. नवीन संधी चालून येतील. वाहन चालवताना काळजी घ्या.
 
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) व्यावसायिक वाढ होईल. कामाचा ताण वाढेल. शत्रूंचा त्रास जाणवेल.
 
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) संमिश्र ग्रहमान आहे. आर्थिक उलाढाल वाढेल. नवीन संधी प्राप्त होतील. धनलाभ होईल.
 
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) संमिश्र दिवस आहे. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. नवीन ओळखी होतील. मंगळ कायदेशीर कटकटीं निर्माण करू शकतो.

(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी -  8087520521)

संबंधित बातम्या