गुरुवार, १ मे २०२५. वैशाख शुक्ल चतुर्थी. वसंत/ग्रीष्म ऋतू. शके १९४७, संवत २०८१. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)
राहुकाळ - दुपारी १.३० ते दुपारी ३.००
"आज सकाळी ११.०० नंतर चांगला दिवस आहे" विनायक चतुर्थी, महाराष्ट्र दिन
नक्षत्र - मृग/ (दुपारी २.२१ नंतर) आर्द्रा. आज जन्मलेल्या बाळाची राशी - मिथुन. (अतिगंड योग, विष्टी करण शांती)
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्राचा शुक्राशी, शनिशी आणि नेपच्यूनशी केंद्र योग आहे. प्रवासात त्रास होऊ शकतो. व्यवसाय वाढेल मात्र अधिक मेहनत करावी लागेल. चैनीवर खर्च कराल. वाहन दुरुस्ती संभवते.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) फारशी अनुकूलता नाही. मात्र आनंदी राहाल. कौटुंबिक मतभेद टाळा. घशाची काळजी घ्या.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) आज तुमच्याच राशीत चंद्र आहे. संमिश्र दिवस आहे. उत्साह वाढेल. भेटवस्तू मिळतील. मात्र महिलांकडून विनाकारण दोषारोप होऊ शकतात.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) संमिश्र दिवस आहे. खर्चात वाढ होईल. मूल्यवान वस्तू सांभाळा. प्रवासात त्रास होऊ शकतो.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) स्त्री धन वाढेल. अर्थकारण सुधारेल. व्यवसायात यश मिळेल. उष्णतेचा त्रास जाणवेल.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) आर्थिक लाभ होतील. प्रवास घडतील. प्रिय व्यक्ती कडून निराशा संभवते.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) संमिश्र दिवस आहे. आनंदी घटना घडतील. अचानक लाभ होतील. प्रवासाचे नियोजन बदलेल. जुनी प्रकरणे बाहेर निघू शकतात.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) शत्रू त्रास जाणवेल. विनाकारण दोषारोप होऊ शकतात. आरोग्याची काळजी घ्या.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) आर्थिक लाभ होतील. येणी वसूल होतील. संपत्ती वाढेल. काही घरगुती कटकटीं संभवतात.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) व्यावसायिक लाभ होतील. धन संपत्ती वाढेल. संतती बाबत खुश खबर मिळेल. मित्र मंडळी भेटतील. बोलताना काळजी घ्या.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) संमिश्र दिवस आहे. सामाजिक कामात भाग घ्याल. महिलांनी मौल्यवान वस्तू सांभाळा. घशाची काळजी घ्या.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) तुम्हाला समाजकार्याची जरी आवड असली तरी आज त्यातून विनाकारण गैरसमज होऊ शकतात. मनःस्ताप होऊ शकतो. प्रलोभने टाळावीत. डोके आणि मन शांत ठेवावे.
- ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521