असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य ३ डिसेंबर

असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य ३ डिसेंबर
  • Positive News
  • डिसेंबर 3 2025

Share on  

निक राशिभविष्य. बुधवार, ३ डिसेंबर २०२५
???? मार्गशीर्ष शुक्ल त्रयोदशी | ???? चंद्र मेष राशीत | ✨ भरणी नक्षत्र
योग: चंद्र लाभ गुरू • चंद्र लाभ शनी • चंद्र प्रतियुती बुध
???? संध्याकाळी ६ पर्यंत अत्यंत उत्तम दिवस

आजचा दिवस उत्साह, प्रगती, लाभ आणि निर्णयक्षमता वाढवणारा आहे.
चंद्र–गुरू लाभयोग भाग्य आणि आर्थिक वृद्धी देतो, चंद्र–शनी लाभयोग स्थैर्य व नियोजनशक्ती वाढवतो, तर चंद्र–बुध प्रतियुती संवादात काळजी घेण्याची सूचना करते. संध्याकाळी ६ नंतर काम सावकाश हाताळा.

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521.

???? मेष

आत्मविश्वास प्रखर. आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता. वरिष्ठांकडून कौतुक. परंतु बोलताना शब्दांची काळजी घ्या, गैरसमज टाळा.

???? वृषभ

नवीन संपर्कातून फायदा. दैनंदिन कामे सुरळीत पार पडतील. खर्चाची शक्यता असूनही गुंतवणूक शुभ. संध्याकाळी थोडा तणाव जाणवू शकतो.

???? मिथुन

नोकरीत प्रगतीचे संकेत. विचारांची देवाणघेवाण करताना सावधान, गैरसमज होऊ शकतो. आर्थिक स्थितीत सुधारणा सुरू.

???? कर्क

भाग्य बलवान. परदेशी कामे, परीक्षांचे निकाल, प्रवास यांसाठी दिवस अनुकूल. घरात आनंददायी वातावरण.

???? सिंह

आर्थिक बाबतीत मोठा लाभ. कार्यक्षेत्रात ताकद वाढेल. नाव–प्रतिष्ठा उंचावेल. पण दस्तऐवज तपासताना काळजी.

???? कन्या

भाग्य तुमच्या बाजूने. नवीन शिकण्यास, कोर्सेस, मुलाखतीसाठी शुभ. नात्यांमध्ये सौहार्द वाढेल. वाद टाळा.

⚖️ तुळ

आरोग्य सुधारेल. पैशांचे नियोजन उत्तम प्रकारे होईल. दैनंदिन कामांमध्ये समाधान. भावनिक प्रतिक्रिया कमी ठेवा.

???? वृश्चिक

प्रेमसंबंधात गोडवा. भागीदारीत लाभ. आर्थिक स्थितीत चांगली वाढ. परंतु संवादात सावधानता आवश्यक.

???? धनु

नोकरीत नवे अवसर. आरोग्य चांगले राहील. घरातील कामे पूर्ण होतील. संध्याकाळनंतर काम हलके ठेवा.

???? मकर

सर्जनशील कार्यात यश. विद्यार्थ्यांसाठी उत्तम दिवस. आर्थिक लाभ. मित्रांकडून मदत. भावनिक निर्णय टाळावेत.

???? कुंभ

घरगुती वातावरण छान. मालमत्ता, वाहन, नूतनीकरण यासाठी शुभ. आर्थिक स्थैर्य वाढेल. संवाद जपून करा.

???? मीन

परदेश, प्रवास व अभ्यासाशी संबंधित लाभ. दैनंदिन कामे गतीने पूर्ण. मानसिक शांती. कागदपत्रांमध्ये अचूकता ठेवा.

-ज्योतिषाचार्य मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521.

संबंधित बातम्या