बुधवार, ९ एप्रिल २०२५. चैत्र शुक्ल द्वादशी. वसंत ऋतू. विश्वावसूनाम संवत्सर, शके १९४७, संवत २०८१.
राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)
राहुकाळ - दुपारी १२.०० ते दुपारी १.३०
"आज उत्तम दिवस आहे" विष्णूला दवणा वाहणे.
नक्षत्र - मघा/(सकाळी ९.५७ नंतर) पूर्वा. आज जन्मलेल्या बाळाची राशी - सिंह.
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्राचा गुरुशी केंद्र (अशुभ) योग आहे. कोणालाही जामीन राहू नका. शब्द देताना जपून द्या. वारसा हक्कचे संपत्ती बाबत अडेलतट्टू भूमिका नको. प्रवास घडतील.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) वाहन सुख लाभेल. अधिकार गाजवाल. पाळीव पशूंचा लाभ/सहवास घडेल. मन शांत ठेवा. सत्संग घडेल.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) अर्थकारण मजबूत होईल. काही सुखद घटना घडतील. कायदे पालन करा. सरकारी कामात दिरंगाई जाणवेल.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) अपेक्षित यश आज मिळणार नाही. काही अंदाज अचूक ठरतील. मोजके बोला. कर्जे घेऊ नका.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) तूमच्याच राशीत चंद्र आहे. बौद्धिक क्षेत्र गाजवाल. नोकरीत वरिष्ठांचा त्रास जाणवेल. गैरसमज टाळा.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) आज फारशी अनुकूलता नाही. महत्वाचे कामे आज नकोत. न्याय मिळेल. खर्च वाढतील.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) अनुकूल चंद्र आहे. मनासारखी कामे होतील. मात्र संयम बाळगावा लागेल. अडलेली कामे मार्गी लागतील. यशाचा वेग कमी राहील.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) क्रोध आवरावा लागेल. शत्रूचा त्रास जाणवेल. कामानिमित्त प्रवास घडतील. ज्येष्ठ व्यक्तीची काळजी घ्या.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) नवम स्थानी चंद्र आहे. दूरचे प्रवास होतील. परदेश गमन संभवते. वाहन जपून चालवा. नियोजन चुकू शकते.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) अष्टम स्थानी चंद्र आहे. जपून वाटचाल करा. संततीची काळजी घ्या. प्रवासात त्रास संभवतो.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) जोडीदारासाठी प्रवास करावा लागेल. नवीन वस्तूची खरेदी होईल. घरापासून दूर काम करावे लागेल.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) व्यवसायात लाभ होतील. प्रगतीचा वेग ठीक राहील. भावाशी विसंवाद संभवतो. अति आत्मविश्वास नको.
व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या
कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521
९ एप्रिल रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
तुम्ही लढाउ वृत्तीचे आहात आणि प्रतिकूल परिस्थितीला तुम्ही सहज तोंड देऊ शकतात. तुमच्या बोलण्यामध्ये वकिली युक्तिवाद असतो. कधीकधी तुमच्यात अहंकार जाणवतो. इतरांवर तुम्ही सहज टीका करतात. मात्र हे तुम्ही टाळले पाहिजे. तुमच्यात उद्धटपणा आणि जोर सुरुवातीपासूनच असतो. मैदानी खेळ, व्यायाम, प्रवास, समुद्रपर्यटन याची तुम्हाला आवड असते. भिन्नलिंगी व्यक्तींकडे तुम्ही लवकर आकर्षित होतात. तुमचा स्वभाव शूर आणि पराक्रमी आहे. तुम्हाला लहान मुले, प्राणी, निसर्ग, आकाश, समुद्र यांची आवड आहे. तुमच्यात नैतिक धैर्य असते. तुमच्यात अमर्याद मानसिक शक्ती आहे. तुमचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन विशाल असतो. तुम्ही विचारवंत, तत्वज्ञानी होऊ शकतात. पैशांची जबाबदारी घेताना तुम्ही अधिक काळजी घेतली पाहिजे, तुमच्या मतांची तुम्ही ठाम असतात. आणि तत्त्वांशी प्रतारणा करत नाहीत. तुम्ही उच्चश्रेणीच्या व्यवसाय किंवा नोकरी करतात आणि चांगले पैसे कमावतात.
व्यवसाय:- पुढारी, राजकारण, कारखाना, डॉक्टर, केमिस्ट, लोखंड, इंजिनियर आणि बांधकाम.
शुभ दिन:- सोमवार, गुरुवार, शुक्रवार.
शुभ रंग:- पिवळा.