असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य ८ एप्रिल

असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य ८ एप्रिल
  • Positive News
  • एप्रिल 8 2025

Share on  

मंगळवार, ८ एप्रिल २०२५. चैत्र शुक्ल एकादशी. विश्वावसुनाम संवत्सर. शके १९४७, संवत २०८१. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)

राहुकाळ - दुपारी ३.०० ते दुपारी ४.३० 

"आज सकाळी ८.०० पर्यंत चांगला दिवस आहे"  कामदा एकादशी 

चंद्रनक्षत्र - आश्लेषा/(सकाळी ७.५५ नंतर) मघा. आज जन्मलेल्या बाळाची राशी -  कर्क/सिंह. (शूल योग, नक्षत्र गंडांत आणि विष्टी करण शांती करून घ्यावी)

टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या फेसबुक पेजला भेट द्या.

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ)  चंद्राचा हर्षलशी (अशुभ) केंद्र योग आहे. दिलेला शब्द पाळावा लागेल. वरिष्ठ नाराज होऊ शकतात. घशाची काळजी घ्या. 
       
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) दबदबा वाढेल. अधिकारात बदल होतील. आर्थिक लाभ होतील. व्यवसायात वाढ होईल. मात्र क्रोधावर नियंत्रण ठेवा.
 
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) कौटुंबिक कार्यात सहभागी व्हाल. दानधर्म कराल. दुर्बल लोकांना मदत कराल. कठोर वागणे टाळा. भाषेवर नियंत्रण ठेवा.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) तुमच्याच राशीत सकाळी चंद्र आहे. काही अडचणी दूर होतील. स्वप्ने पूर्ण होतील. दिवस सत्करणी लावा. प्रवास घडतील.
    
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे)  संमिश्र दिवस आहे. व्यय स्थानी चंद्र आहे. आध्यत्मिक लाभ होतील. अधिक मेहनत करावी लागेल. नोकरीच्या ठिकाणी कटू अनुभव येऊ शकतात.
  
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) संमिश्र ग्रहमान आहे. आर्थिक लाभ होतील. प्रतिष्ठा जपण्यासाठी खर्च करावा लागेल. प्रवासात अडचणी येऊ शकतात.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) आर्थिक लाभ होतील. नोकरीत नवीन संधी मिळतील.  कामानिमित्त प्रवास घडतील. सुसंवाद वाढेल. अप्रिय बातमी येऊ शकते.
   
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु)अनुकूल चंद्र आहे. स्पर्धेत यश मिळेल. भौतिक सुखाचा आनंद घ्याल. गूढ उलगडतील. कोर्ट कामात दिरंगाई जाणवेल.
 
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) संमिश्र दिवस आहे. सुरुवात फारशी चंगली नाही. उत्तरार्ध अनुकूल आहे. घरातील ज्येष्ठ व्यक्तीची काळजी घ्या. दानधर्म करण्यास उत्तम दिवस आहे.  
 
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) संमिश्र दिवस आहे. जुने वाद मिटवा. संयमाची भूमिका घ्या. प्रेमात अपयश संभवते. शेअर्स मध्ये मोठे नुकसान होऊ शकते.
 
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) सकाळी ८.०० नंतर अनुकळता वाढेल. आर्थिक लाभ होतील. शेतीतून उत्तम लाभ होतील. व्यवसाय वाढेल. जंगलात फिरताना काळजी घ्या. 
 
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) आर्थिक लाभ होतील. स्पर्धेत यश मिळेल. छोटे प्रवास घडतील. लेखकांनी काळजी घ्यावी.

 - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521.

८ एप्रिल रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-

     तुमच्यावर शनि आणि मंगळाचा प्रभाव आहे. तुम्हाला शांत बसणे, एकांतात राहणे, ध्यानधारणा करणे, उपासना करणे आवडते. कोणत्याही गोष्टीचा तुम्ही सखोल अभ्यास आणि चिंतन करतात. तुम्हाला शास्त्रीय संगीताचे आवड असून धीरगंभीर प्रकारचे संगीत ऐकणे आवडते. शिस्त आणि नियमितपणा तुम्हाला आवडत असला तरी स्वतः स्वच्छता करणे किंवा घर आवरणे तुम्हाला जमत नाही. भविष्याबद्दल चे नियोजन तुम्ही काळजीपूर्वक केले पाहिजे. तुम्ही धोरणी आणि बुद्धिमान आहात. 'जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती' असे तुमचे व्यक्तिमत्त्व आहे. तुम्ही नवनवीन शोध लावतात. उच्चशिक्षण घेतात मात्र व्यावहारिक बाबतीत तुम्ही कमी पडतात. तुम्ही रात्र रात्र जागून काम करू शकतात आणि अवजड यंत्र हाताळू शकतात. तुमचा स्वभाव आक्रमक आहे आणि यशस्वी होण्याचे तुम्हाला घाई झालेली असते. तूम्ही नेहमी वकिली युक्तिवाद करत बोलतात मात्र तुमचा उद्देश चांगला असतो. तुम्हाला नाजूकपणा जमत नाही. मैदानी खेळ तसेच व्यायाम या तुम्हाला आवडते. तुम्ही निश्चय आणि शिस्तीचे भोक्ते असतात. तुमचे विचार समतोल असतात आणि दोन्ही पक्ष समजून घेणे तुम्हाला चांगले जमते. तुम्ही दीर्घोद्योगी असतात. कष्ट करण्याची तुमची तयारी असते. तुमचा स्वभाव मात्र संशयखोर आहे. तुम्ही तासन्तास एखाद्या विषयावर भांडू शकतात. तुम्ही कितीही गर्दीत असला तरी मनाने एकटे असतात. आजारी लोकांना आपण चमत्काराने बरे करावे असे तुम्हाला वाटते. तुम्हाला अधिकाराच्या जागा मिळू शकतात. कधीकधी तुम्हाला नैराश्य येते मात्र तुम्ही तुमचे विचार मित्रांकडे व्यक्त करत नाहीत.

व्यवसाय:- लाकूड, कोळशाची खाण, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, रेल्वे, परिवहन खाते, संशोधन, लेखन, 

शुभ दिवस:- बुधवार, गुरुवार, शनिवार.

शुभ रंग:- राखाडी.

व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या

कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521

संबंधित बातम्या