शनिवार, ५ एप्रिल २०२५. चैत्र शुक्ल अष्टमी. वसंत ऋतू. विश्वावसुनाम संवत्सर. शके १९४७, सनावत २०८१. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)
राहुकाळ - सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०
"आज सकाळी ८.०० नंतर चांगला दिवस आहे" दुर्गाष्टमी
चंद्र नक्षत्र - पुनर्वसू. आज जन्मलेल्या बाळाची राशी - मिथुन. (अतिगंड योग, विष्टी करण शांत)
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्र त्रिकोण बुध, शुक्र, शनी योग आहे. रवी केंद्र चंद्र आहे. व्यवसायात वाढ होईल. आर्थिक लाभ होतील. कामे पूर्ण होतील. धर्म कार्य कराल. सरकारी कामातून मात्र त्रास होऊ शकतो.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) अत्यंत अनुकूल दिवस आहे. वेळ न दवडता कामे पूर्ण करा. नवीन व्यवसाय सुरू कराल.धार्मिक यात्रा करण्यासाठी उत्तम कालावधी आहे. दानधर्म करा.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) उत्तम आणि अनुकूल दिवस आहे. नोकरीतील अनुभवाचा फायदा होईल. बढती मिळेल. मन प्रसन्न राहील. वरिष्ठांची मर्जी मात्र सांभाळावी लागेल.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) अजूनही फारशी अनुकूलता नाही. वादविवाद टाळा. कोर्ट कचेरीत वेळ वाया जाईल. खर्चात वाढ होऊ शकते. संध्याकाळ आनंदाची.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) अनुकूल ग्रहमान आहे. उत्तम अर्थप्राप्ती होईल. कामे पूर्ण होतील. गरजूना मदत करा. स्त्री धन वाढेल.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) तुमच्या कडून अपेक्षा वाढतील. संध्याकाळ आनंदाची. मोठी गुंतवणुक आज टाळा. व्यावसायिक प्रतिस्पर्धी शरण येतील.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) स्थावर संपत्ती बाबत काही मार्ग निघू शकतात. व्यावसायिक जागेत बदल संभवतो. विजयश्री खेचून आणाल.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) संमिश्र ग्रहमान आहे. शौर्य दाखवण्याची वेळ नाही. अनैतिक कामे टाळा. कायदे पालन आवश्यक आहे.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) मन उत्साही राहील. अपेक्षित यश मिळेल. आशादायक घटना घडतील. शेती कामात वाद टाळा.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) मन आनंदी राहील. सौख्य लाभेल. व्यवसाय वाढेल. अर्थकारण मजबूत होईल. कनिष्ठ व्यक्तींची साथ लाभेल.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) अनुकूल दिवस आहे. दिवसभरात महत्वाची कामे पूर्ण करा. वक्तृत्व गाजेल. खरेदी होईल. इतरांना जमीन राहू नका.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) ग्रहमान अनुकूल आहे. वाहन सुख लाभेल. व्यापारात लाभ होतील. मात्र नियोजन बदलेल. छोटे प्रवास घडतील.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी - 8087520521)