असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य ३ एप्रिल

असा असेल   तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य ३ एप्रिल
  • Positive News
  • एप्रिल 3 2025

Share on  

आजचे राशिभविष्य आणि आज जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्य:-

गुरुवार, ३ एप्रिल २०२५. चैत्र शुक्ल षष्ठी. वसंत ऋतू. शके १९४७, संवत २०८१. विश्वावसुनाम संवत्सर. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)

राहुकाळ - दुपारी १.३० ते दुपारी ३.०० 

"आज उत्तम दिवस आहे" कार्तिक स्वामींना दवणा वाहणे.

नक्षत्र - मृग. आज जन्मलेल्या बाळाची राशी - वृषभ/ (संध्याकाळी ६.२२ नंतर) मिथुन.

टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्राचा नेपच्यून, बुध, शुक्र, शनीशी केंद्र योग आहे. अनुकूलता नाही. जपून पावले टाका. बोलताना काळजी घ्या. मोठे खर्च निघू शकतात. 
     
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) बरेच ग्रह अनुकुल आहेत. मनातील इच्छा पूर्ण होतील. आनंदी राहाल. सगळीच कामे काही मनासारखी होत नसतात. संयम आवश्यक आहे.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) आज दुपार नंतर तुमच्याच राशीत चंद्र आहे. दिवसाची सुरुवात फारशी चांगली होणार नाही. नंतर उत्साह वाढेल. भेटवस्तू मिळतील.मात्र फारसा आशादायक दिवस नाही. नोकरीच्या ठिकाणी कटकटी टाळा.
 
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) संमिश्र दिवस आहे. सकाळच्या सत्रात मनासारखी कामे होतील. स्वप्ने साकार होतील. संध्याकाळनंतर खर्चात वाढ होईल.
 
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) बरेच ग्रह नाराज आहेत. आज फारसे चांगले योग नाहीत. मात्र चंद्र अनुकूल आहे. कामाच्या ठिकाणी सुखद अनुभव येतील. नोकरी/ व्यवसायात यश मिळेल. मात्र अनैतिक कामे कटाक्षाने टाळा.   
  
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) आर्थिक लाभ होतील. प्रवास घडतील. बोलताना काळजी घ्या. प्रवासाचे नियोजन बदलेल. व्यवसायात मतभेद संभवतात.
 
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) संमिश्र दिवस आहे. सुरुवात फारशी चांगली नाही. हळूहळू फरक पडेल. उत्साह वाढेल. आनंदी घटना घडतील. आरोग्याची काळजी घ्या.  
  
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) सकाळच्या सत्रात महत्वाची कामे पूर्ण करून घ्या. शत्रू पराभूत होतील. वाहन सुख लाभेल. संध्याकाळ चिंता वाढवणारी असू शकते. 

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) आर्थिक लाभ होतील. येणी वसूल होतील. संपत्ती वाढेल. आरोग्याच्या तक्रारी वाढतील. समाज कार्य करतांना जरुरीपेक्षा जास्त गुंतू नका.
 
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) संमिश्र ग्रहमान आहे. व्यावसायिक  लाभ होतील. धन संपत्ती वाढेल. नात्यात विनाकारण विसंवाद होऊ शकतो. प्रेमात गैरसमज होतील.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) सामाजिक कामात भाग घ्याल. आनंदी आणि समाधानी वाटेल.  व्यवसायासाठी वेळ द्यावा लागेल. बोलताना काळजी घ्या. संध्याकाळ चिंता वाढवणारी.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) संमिश्र ग्रहमान आहे. कामे पूर्ण करा. भेटवस्तू मिळतील. सामाजिक कार्य करताना कोणालाही दुखवू नका.

- ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521

३ एप्रिल रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-

     तुमच्यावर मंगळ आणि हर्षल या ग्रहांचा प्रभाव आहे. मंगळ स्पष्टवक्ता, शीघ्रकोपी, अतिश्रम करणारा तर हर्षल अकल्पित घटना घडवून आणणार आहे. तुम्ही अत्यंत महत्त्वाकांक्षी असतात आणि सतत प्रगती करण्याचा तुम्हाला ध्यास लागलेला असतो. तुम्हाला धार्मिक गोष्टींबद्दल ओढ असली तरी कर्मकांडावर तुमचा विश्वास नसतो. तुम्ही दानशूर असतात मात्र त्याचे प्रदर्शन करतात. तुम्हाला न्यायाचे आवड असते. इतरांना मदत करण्यासाठी तुम्ही सदैव तयार असतात. तुम्ही शीघ्रकोपी आहात. उत्साही आहात आणि सतत कार्यमग्न असतात. तुम्ही कारखाना चांगल्या प्रकारे चालवू शकतात. तुमचा स्वतंत्र बाणा आहे आणि तुमच्या अंगावर आलेली जबाबदारी तुम्ही योग्यपणे पार पाडू शकतात. इतरांनी तुमच्या कामात लुडबुड केलेली तुम्हाला आवडत नाही. तुमच्या डोकं जर तुम्ही शांत ठेवले तर जीवनात तुम्ही अधिक प्रगती करू शकाल. तुम्ही हट्टीपणा टाळला पाहिजे. तुम्ही शुद्ध प्रेम करणारे, दयावान आणि नीतिमान आहात. तुमच्यात आत्मविश्वास पुरेपूर भरलेला आहे. तुम्हाला इतरांच्या सल्ल्याची गरज पडत नाही. तुमचे वागणे रुबाबदार असून टापटीप आणि व्यवस्थित पण आढळतात. तुम्हाला उत्तम संभाषण शैली लाभलेली आहे. आणि तुम्ही बोलण्यात मोकळेढाकळे असतात. तुम्हाला मैदानी खेळांची आवड आहे. तुमचा दृष्टिकोन विशाल असतो आणि स्वभाव मिश्किल असतो. सहसा इतरांचा द्वेष किंवा मत्सर तुम्ही करत नाहीत.

व्यवसाय:- राजकीय नेता, मंत्री, जज, सचिव, धार्मिक गुरु, सल्लागार, सावकारी, जाहिरात, अभिनय, व्यायाम शिक्षक.

शुभ दिवस:- मंगळवार, गुरुवार, शुक्रवार.

शुभ रंग:- किरमिजी.

व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या

कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521

संबंधित बातम्या