शनिवार, २६ एप्रिल २०२५. चैत्र कृष्ण त्रयोदशी/चतुर्दशी. विश्वावसुनाम संवत्सर. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)
राहुकाळ - सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०
"आज क्षय तिथी आहे" शिवरात्री
नक्षत्र - उत्तरा भाद्रपदा. (सकाळी ६.२७ नंतर ) रेवती. आज जन्मलेल्या बाळाची राशी - मीन. (वैधरुती, विष्काभ, विष्टी, शकुनी हे अशुभ योग)
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्र गुरू लाभ योग आहे. मात्र व्यय स्थानी चंद्र आहे. इतरांची देणी देऊन टाका. कर्जे फेडून टाका. चुकी झाली असल्यास माफी मागा. दानधर्म करण्यास उत्तम कालावधी आहे.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) चंद्र अनुकूल आहे. आनंदी राहाल. कलाकारांना यश मिळेल. स्वप्ने साकार होतील. मन प्रसन्न राहील.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) कला प्रांतात उत्तम नावलौकिक होईल. नोकरीत सुखद अनुभव येतील. मात्र फार मोठी जोखीम घेऊ नका.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) कर्म करत रहा. आज फळाची फार अपेक्षा करू नका. मात्र कामे मार्गी लागतील. सत्संग लाभेल.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) संमिश्र दिवस आहे. अष्टम स्थानी चंद्र आहे. घरातील जेष्ठ व्यक्तीची काळजी घ्या. मौल्यवान वस्तू सांभाळा.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) प्रवासाचे योग आहेत. भौतिक सुखे प्राप्त होतील. समाधानी राहाल. तीर्थयात्रा घडेल.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) संमिश्र ग्रहमान आहे. कितीही उत्साह असला तरी आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. श्री. शंकर भगवान आराधना करा.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) अनुकूल ग्रहमान आहे. पंचम स्थानी चंद्र आहे. आध्यत्मिक लाभ होतील. अचानक लाभ होतील. धार्मिक अधिष्ठान घडेल.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) आज घरगुती कामे पूर्ण करावीत. नवनवीन योजना पार पडतील. सन्मान मिळतील. धाडसी निर्णय घ्याल.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) व्यवसायात आर्थिक प्रगती साध्य होईल. येणी वसूल होतील. आर्थिक चिंता मिटतील. आज महत्वाची कामे नकोत.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) तुमच्या द्वितीया स्थानी चंद्र आहे. जमीन व्यवहारात यश मिळेल. वाहन सुख लाभेल.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) तुमच्याच राशीत चंद्र आहे. पराक्रम गाजवण्याचा दिवस आहे. बंधुभाव वाढीस लागेल. आत्मविश्वास वाढेल. आध्यत्मिक प्रगतीस अनुकूल कालावधी आहे.
- ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521.