असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य २४ एप्रिल

असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य २४ एप्रिल
  • Positive News
  • एप्रिल 24 2025

Share on  

गुरुवार, २४ एप्रिल २०२५. चैत्र कृष्ण एकादशी/द्वादशी. ग्रीष्म ऋतू. उत्तरायण. विश्वावसु नाम संवत्सर. शके १९४६, संवत २०८१. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)

राहू काळ - दुपारी १.३० ते दुपारी ३.००

"आज चांगला दिवस आहे." वरूथीनि एकादशी श्री. वल्लभचार्य जयंती.

चंद्र नक्षत्र - शततारका (राहू)/ (सकाळी १०.४९ नंतर) पू. भा.(गुरू) आज जन्मलेल्या बाळाची राशी - कुंभ.  
 
मेष:- चंद्र केंद्र गुरू आहे. अनुकूल चंद्र आहे. प्रापंचिक सुख मिळेल. उत्तम सहकार्य लाभेल. सखोल संशोधन कराल.  
     
वृषभ:-  मन आनंदी राहील. सामाजिक कार्यात भाग घ्याल. नोकरीत कामाचा जोर वाढेल. मनासारख्या घटना घडतील. 
 
मिथुन:- नवम स्थानी चंद्र आहे. पालकांची पुण्याई मदत करेल. पराक्रम गाजवाल. दबदबा वाढेल. सिद्धी प्राप्त होतील. 

कर्क:- संमिश्र दिवस आहे. अष्टम स्थानी चंद्र आहे. मोठी जोखीम घेऊ नका. वादविवाद टाळा. अनुकूल गुरू मदत करेल.
 
सिंह:- आत्मविश्वास वाढलेला आहे. कर्तृत्व दाखवल्यास आज यश मिळेल. भागीदारीत वादविवाद टाळा. कायदेशीर सल्ला घ्या.
  
कन्या:- आर्थिक लाभ होतील. कामाचा व्याप वाढेल. विनाकारण त्रास होईल. खर्च वाढतील. प्रवास टाळा.
 
तुळ:- पंचम स्थानी चंद्र आहे.  सुखद अनुभव येतील. उत्साह वाढेल. प्रवास कार्यसाधक होतील. गुंतवणूक करण्यास चांगला दिवस आहे मात्र योग्य सल्ला घ्या.
 
वृश्चिक:- मौल्यवान खरेदी होईल. कामाचा पसारा वाढेल. ऐनवेळी नवीन जबाबदारी येऊन पडेल. हरवलेली वस्तू सापडेल.

धनु:- काही विशेष घटना घडतील. नवीन संधी चालून येतील. प्रवास होतील. एखादी अप्रिय बातमी समजू शकेल.
 
मकर:- संमिश्र कालावधी आहे. आध्यत्मिक लाभ होतील. कुटुंबास वेळ द्या. क्रीडा क्षेत्रात यश मिळेल. राजकीय क्षेत्रात वाटचाल कराल.   
 
कुंभ:- तुमच्याच राशीत चंद्र आहे. भेटवस्तू मिळतील. येणी वसूल होतील. सखोल संशोधन करण्यास उत्तम कालावधी आहे. घरगुती कामे कराल.
 
मीन:- संमिश्र दिवस आहे. व्यवसायात लाभ होतील. आर्थिक स्थिती सुधारेल. बचतीतून मदत होईल. दानधर्म करावा.

 - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521

संबंधित बातम्या