महिलांसाठी ज्योतिष:-
सौ मधुरा मंगेश पंचाक्षरी नाशिक
मोबाइल 9272311600
बुधवार, 22 एप्रिल 2026. वैशाख शुक्ल षष्ठी
श्री नृसिंह नवरात्र आरंभ,श्री रामनुजाचार्य जयंती,घबाड रात्री 10:13पर्यंत
राहुकाळ - दुपारी 12 ते 1:30
आज चांगला दिवस.
आज जन्मलेल्या बाळाची रास मिथून रास, अतिगंड योग शांती
22 एप्रिल रोजी जन्मलेल्या महिलांची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा ????
तुमच्यावर हर्षल आणि मंगळ या दोन ग्रहांचा प्रभाव आहे. मंगळ हा कठोर, स्पष्टवक्ता, आक्रमक, तापट आहे तर हर्षल अकल्पित गोष्टींचा कारक आहे. शरीरयष्टी चांगली असून डोळे छान असतात. स्वभावात अस्थिर ता असते.कौटुंबिक जीवन सुखाचे असते.मैत्र परिवार अतिशय छोटा असून भांडणाची फिकीर करीत नाही.प्रतिष्ठा ,कर्तृत्व ला लौकर मान्यता मिळते.जीवनचा पुर्वार्ध कष्ट दायी असला तरी उत्तरार्धात यश, सफलता मिळते.बरेचदा एकटेपण जाणवते.
तुमच्या जीवनात बरेचदा विरोधाभास जाणवतो. आयुष्यात अनेक चढ-उतार अनुभवास येतात. अनेक विलक्षण आणि चमत्कारीक घटना तुमच्या आयुष्यात घडत असतात. तुम्ही तुमच्या राहत्या जागेत, नोकरी व्यवसायात सतत बदल करत असतात. त्यामुळे कधीकधी आयुष्यात अस्थिरता निर्माण होते. तुमच्या मध्ये उत्साह आहे आणि तुम्ही सतत प्रगती करत असतात. तुमच्या मनाचे पातळी उच्च दर्जाची आहे. मानवी जीवनाच्या कल्याणासाठी तुम्ही योगदान देतात. रूढी आणि बंधने किंवा परंपरा यांचा तुम्हाला तिरस्कार असतो. तुम्ही सच्चा मनाचे असतात आणि खोटेपणा तुम्हाला आवडत नाही. तुमचे व्यक्तिमत्व आकर्षक असते. तुमचा स्वभाव परखड आहे. त्यामुळे अनेकदा तुमचे विचार इतरांना पटत नाही. समोरची व्यक्ती दुखावली तरी चालेल मात्र आपला स्पष्टवक्तेपणा तुम्ही सोडत नाहीत. त्यामुळे अनेकदा मित्रांचा गैरसमज होतो. तुम्ही अहंकार आणि उद्धटपणा टाळला पाहिजे. आयुष्यात येणाऱ्या धोक्यांना तुम्ही घाबरत नाही आणि यशस्वीपणे तोंड देतात. तुमचा मैत्रपरिवार मोठा असतो. घरातून किंवा कौटुंबिक संबंधातून तुम्हाला त्रास दिला जाऊ शकतो. तुमच्या कामात कोणी ढवळाढवळ केलेली सहन होत नाही ,जर केली तर तुम्ही तुमचे काम सोडून बाहेर पडतात .डोके शांत ठेवून काम केल्यास आयुष्यात चांगले यश मिळेल. परंतु हट्टीपणा व उद्धटपणामुळे तुम्हाला कायम अडचणी येतात .तुम्ही निर्भीड असून कोणत्याही धोक्याला तोंड देण्यास तयार असतात. जीवनात सतत बदल असावा यामुळे मित्रपरिवार सतत बदलत असतो .आयुष्यात अनेक अडचणी विलंब असूनही पैशाच्या बाबतीत समाधानी असतात .खर्चिक असून घरात सर्व सुख सुविधा ठेवण्याकडे कल असतो .तुम्ही तलक व आकर्षक आहात .तीव्र इच्छाशक्ती असून नीट नेटकेपणा व चांगल्या कपड्यांचे शौकीन असतात. तुम्ही महत्त्वाकांक्षी माणसाची उत्तम पत्नी होऊ शकतात. पत्नीला त्याच्या व्यवसायात मदत करतात .घरातील सजावट उत्तम तऱ्हेने करता .बऱ्याच वेळा स्वतःचा वरचढ पणा दाखवण्याची लहर येते. काही वेळा आपल्या चमत्कारिक स्वभावामुळे सबंध दिवस खराब जातो .तुम्हाला आपल्या घराबद्दल आपलेपणा आहे पण ओढ नसते .बऱ्याच वेळा तुम्ही अस्वस्थ असता अशा वेळी एक किंवा दोन भाग्यांक असलेल्या व्यक्तीच्या सानिध्यात राहणे उपयुक्त ठरेल.
शुभ दिवस:- रविवार, सोमवार, शुक्रवार.
शुभ रंग:- पांढरा,निळा,गुलाबी
शुभ रत्ने:- हिरा,मोती,पोवळे
(कुंडली तपासूनच रत्ने वापरावी)
आजचे राशिभविष्य
मेष
मैत्रीणींनो आज
आज कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पना आणि धाडस यांना मान्यता मिळेल. वरिष्ठांशी बोलताना आत्मविश्वास ठेवा. घरात एखाद्या स्त्री सदस्याशी गैरसमज दूर होतील. आर्थिक बाबतीत खर्चावर नियंत्रण ठेवा.
वृषभ
मैत्रीणींनो आज
कुटुंब आणि पैशांच्या बाबतीत चांगली बातमी मिळू शकते. जुन्या अडचणींवर मार्ग सापडेल. एखादे अडकलेले काम पूर्ण होईल. महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे आणि विश्रांतीकडे दुर्लक्ष करू नये.
मिथुन
मैत्रीणींनो आज तुमच्याच राशीत होणारी
चंद्र आणि गुरूची युती तुमच्यासाठी खूप शुभ आहे. तुमचा प्रभाव वाढेल, लोक तुमचे म्हणणे ऐकतील. नवीन काम, मुलाखत किंवा नात्यात पुढाकार घेतल्यास यश मिळू शकते. आजचा दिवस आत्मविश्वास वाढवणारा राहील.
कर्क
मैत्रीणींनो आज
मनात थोडी चिंता किंवा गोंधळ राहू शकतो. मात्र शांत राहून विचार केल्यास योग्य निर्णय मिळेल. गुप्त शत्रू किंवा मागून बोलणाऱ्या लोकांपासून सावध राहा. अध्यात्म, प्रार्थना किंवा ध्यान यामुळे मन शांत राहील.
सिंह
मैत्रीणींनो आज
मैत्री, सामाजिक संबंध आणि नवीन संपर्क यामुळे फायदा होईल. एखादी महिला मैत्रीण किंवा सहकारी मदतीला येईल. आर्थिक लाभ किंवा नवीन संधी मिळू शकते. संध्याकाळी आनंदाचा क्षण अनुभवता येईल.
कन्या
मैत्रीणींनो आज
कामाच्या ठिकाणी तुमची मेहनत दिसून येईल. वरिष्ठ किंवा कुटुंबातील वडीलधारी व्यक्तीकडून कौतुक मिळेल. करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी आहे. आज जबाबदाऱ्या वाढतील, पण त्यातूनच प्रगती होईल.
तुळ
मैत्रीणींनो आज
प्रवास, शिक्षण, धार्मिक किंवा आध्यात्मिक विषयांमध्ये रुची वाढेल. महिलांसाठी नवीन शिकण्याचा किंवा पुढील योजना आखण्याचा दिवस आहे. एखादी शुभ बातमी दूरच्या व्यक्तीकडून मिळू शकते.
वृश्चिक
मैत्रीणींनो आज
आज आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करा. जोडीदाराशी किंवा कुटुंबाशी संबंधित विषयात संयम बाळगा. अचानक खर्च किंवा भावनिक ताण येऊ शकतो, पण योग्य संवादामुळे परिस्थिती सुधारेल.
धनु
मैत्रीणींनो आज
वैवाहिक आणि नातेसंबंधाच्या बाबतीत आजचा दिवस महत्त्वाचा आहे. जोडीदाराशी चर्चा करून मोठा निर्णय घेऊ शकता. अविवाहित महिलांना नवीन ओळख किंवा प्रस्ताव मिळण्याची शक्यता आहे.
मकर
मैत्रीणींनो आज रोजच्या कामांमध्ये धावपळ वाढेल, पण त्यातून समाधानही मिळेल. आरोग्य आणि वेळेचे नियोजन महत्त्वाचे ठरेल. कामाच्या ठिकाणी एखादी जुनी समस्या सुटू शकते.
कुंभ
मैत्रीणींनो आज रोमॅंटिक दिवस ,प्रेमात यश.आणि मुलांशी संबंधित विषयांमध्ये आनंद मिळेल. महिलांनी स्वतःच्या आवडीसाठी वेळ द्यावा. नवीन कल्पना आणि योजना पुढे नेण्यासाठी दिवस उत्तम आहे.
मीन
मैत्रीणींनो आज घर, कुटुंब आणि भावनिक बाबींना प्राधान्य द्यावे लागेल. घरात काही बदल, सजावट किंवा कौटुंबिक चर्चा होऊ शकते. आई किंवा वडीलधाऱ्या स्त्रीकडून मार्गदर्शन मिळेल. मनातला ताण कमी होईल.
सौ मधुरा मंगेश पंचाक्षरी नाशिक
मोबाईल 9272311600
लग्न ,करियर, गुण मीलन विषयी
सशुल्क पत्रिका पाहण्यासाठी संपर्क करावा.