शनिवार, १९ एप्रिल २०२५. चैत्र कृष्ण षष्ठी/सप्तमी. विश्ववसुनाम संवत्सर. शके १९४७. संवत २०८१. ग्रीष्म ऋतू. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)
राहुकाळ - सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०
"आज संध्याकाळी ६.०० पर्यंत चांगला दिवस आहे" सौर ग्रीष्म ऋतू प्रारंभ.
चंद्रनक्षत्र - मूळ/(सकाळी १०.२१ नंतर) पू षा. आज जन्मलेल्या बाळाची राशी - धनु. ( विष्टी करण, मूळ नक्षत्र शांती)
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या फेसबुक पेजला भेट द्या.
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) मंगळ त्रिकोण नेपच्यून योग आहे. बौद्धिक क्षेत्र गाजवाल. मार्ग सापडेल. प्रवास घडतील.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) संमिश्र दिवस आहे. आत्मसन्मान ठेवणे आवश्यक आहे. विनाकारण अहंकार बाळगू नका. पित्याची काळजी घ्या.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) मित्रांचे सहकार्य मिळेल. उत्तम लाभ होतील. प्रिय व्यक्तीची भेट होईल. कोर्टात यश मिळेल.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) व्यवसाय वाढेल. कामानिमित्त बाहेर गावी जावे लागू शकते. वक्तृत्व गाजेल. उत्तम युक्तिवाद कराल.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) अचानक लाभ होतील. उपासना फळास येईल. छोटी सहल घडेल. धार्मिक कार्य घडेल. क्रोध आवरा.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) अडथळे दूर होतील. नवीन संधी निर्माण होतील. कायदेशीर बाबतीत सजग रहा. दबदबा वाढेल.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) व्यवसाय वाढेल. आर्थिक प्रगती होईल. जोडीदाराला विश्वासात घ्या. अधिकार वाढतील.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) अनुकूल दिवस आहे. अधिकाराचा लाभ मिळेल. सन्मान होईल. दिशा सापडेल.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) सौख्य प्रदान करणारा दिवस आहे. मन आनंदी राहील. नावलौकिक वाढेल. वाहन जपून चालवा.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) संमिश्र दिवस आहे. अपेक्षाभंगाचे दुःख पदरात येऊ शकते. राजकीय क्षेत्रात मोठी उडी नको.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) अनुकूल चंद्र वाटचाल सुकर करेन. काही सुखद अनुभव येतील. यशस्वी व्हाल. मनासारखे धनलाभ होईल.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) सुखकारक दिवस आहे. आर्थिक आवक उत्तम होणार आहे. मन उत्साही राहील. खर्च वाढतील.
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी. (सायन ज्योतिषी)