गुरुवार, १७ एप्रिल २०२५, चैत्र कृष्ण चतुर्थी/पंचमी. वसंत ऋतू, विश्वावसुनाम संवत्सर. शके १९४७, संवत २०८१. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)
राहुकाळ - दुपारी १.३० ते दुपारी ३.००
आज वर्ज्य दिवस आहे.
चंद्रनक्षत्र - ज्येष्ठा. आज जन्मलेल्या बाळाची राशी - वृश्चिक.
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्र - प्र - गुरू आहे. फारसी अनुकूलता नाही. अध्यात्मिक प्रगती होईल. अंतर्मुख व्हाल. महत्वचे करार आज नकोत. कर्जे घेणे टाळा.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो)
प्रतिस्पर्धी तुमच्यावर मात करू शकतो. कोर्टात अपेक्षित निकाल लागणार नाही. मन स्थिर ठेवा. उपासना करा.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) चांगला दिवस आहे. आर्थिक लाभ होतील. सिद्ध व्यक्तीचे सान्निध्य लाभेल. दयाळूपणा दाखवाल.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) चांगला दिवस आहे. गुंतवणूक पुरेसा लाभ मिळवून देईल. गुरुची अनुकूलता काहीशी कमी जाणवेल. संतती कडून चांगली बातमी समजेल.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) संमिश्र दिवस आहे. एखादी चांगली बातमी समजेल. प्रवास कार्यसाधक होतील. नोकरीच्या ठिकाणी अधिक लक्ष द्यावे.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) आर्थिक प्रगती चांगली होणार आहे. अनुकूलता वाढेल. प्रवासाचे नियोजन बदलू शकते. आरोग्यात सुधारणा होईल.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) संमिश्र दिवस आहे. प्रिय व्यक्तीसाठी वेळ द्याल. आर्थिक प्रगती होईल. आकस्मित धनलाभाच्या मोहाला बळी पडू नका.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) अनुकूल दिवस आहे. कुटुंबासाठी वेळ द्यावा लागेल. वारसा हक्काचे प्रश्न सुटतील. कोणाच्या भरवशावर न राहता स्वतः कामे करावी लागतील.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) दिवस फारसा अनुकूल नाही. महत्वाचे निर्णय टाळावेत. मोठे करार आज नकोत.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) चंद्र अनुकूल आहे. सौख्य लाभेल. संतती साठी वेळ द्यावा लागेल. स्वप्ने साकार होतील. कामाची गती काहीशी संथ असेल.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) अनुकूल दिवस आहे. दशम स्थानी चंद्र आहे. व्यवसायीक कामासाठी वेळ राखून ठेवा. आर्थिक नियोजन करा.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) सौख्य लाभेल. अनपेक्षित लाभ होतील. प्रवासाचे नियोजन बदलेल. प्रेमाच्या जाळ्यात अडकू नका, फसवणूक होऊ शकते.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी - 8087520521)