बुधवार, १६ एप्रिल २०२५. चैत्र कृष्ण चतुर्थी. विश्वावसु नाम संवत्सर. वसंत ऋतू. शके १९४७, संवत २०८१. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)
राहू काळ - दुपारी १२.०० ते दुपारी १.३०
चंद्र नक्षत्र - अनुराधा. आज जन्मलेल्या बाळाची राशी - वृश्चिक. (व्यतिपात योग, विष्टी करण शांती करून घ्यावी)
"आज व्यतिपात वर्ज्य दिवस आहे." संकष्टी चतुर्थी (चंद्र उदय मुंबई - रात्री ९.५१, नाशिक ९.४९)
मेष:- चंद्राचा बुध आणि नेपच्यूनशी शुभ त्रिकोण योग आहे. अष्टम स्थानी चंद्र आहे. संमिश्र दिवस आहे. स्वतःच्या आनंदासाठी खर्च कराल. महत्वाचा निर्णय घ्याल. प्रवास घडतील.
वृषभ:- आज उत्तम दिवस आहे. आर्थिक लाभ होतील. प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल. कायदेशीर कटकटींतून सुटका होईल. पर्यटन घडेल.
मिथुन:- अनुकूल दिवस आहे. सुखद अनुभव येतील. प्रवास घडतील. व्यापारात भरभराट होईल. अधिकार वाढतील.
कर्क:- पंचम चंद्र अनेक चांगले अनुभव देईन. घरगुती काम पूर्ण होईल. शेअर्स मधून लाभ मिळतील. प्रवास घडतील.
सिंह:- संमिश्र कालावधी आहे. अर्थकारण भक्कम होईल. येणी वसूल होतील. घरगुती कामे कराल. जमीन व्यवसायातून लाभ होतील.
कन्या:- त्रितीय चंद्र आहे. व्यावसायिक यश मिळेल. आर्थिक लाभ होतील. नात्यातून उत्तम सहकार्य लाभेल. कनिष्ठ सहकारी योग्य सल्ला देतील.
तुळ:- यश मिळेल. आत्मविश्वास वाढेल. कलाकारांना चांगला दिवस आहे. वक्तृत्व चमकेल. वाहन सौख्य लाभेल.
वृश्चिक:- तुमच्याच राशीत चंद्र आहे. अनुकूल दिवस आहे. भागीदारी व्यवसायात यश मिळेल. आत्मविश्वास वाढेल. भरभराट होईल. प्रवास घडतील.
धनु:- संमिश्र ग्रहमान आहे. व्यय स्थानी चंद्र आहे. काही अप्रिय अनुभव येतील. कामाचे नियोजन बदलेल. पाण्यापासून काळजी घ्या.
मकर:- एकादश स्थानी चंद्र आहे. बढतीचे योग आहेत. नोकरीत चांगल्या घटना घडतील. कलाकारांना मोठे यश मिळेल. पाहुणे मंडळींचा राबता राहील.
कुंभ:- अनुकूल ग्रहमान आहे. व्यवसाय वाढेल. कामे मार्गी लागतील. प्रगतीचा वेग वाढेल. धन धान्य वाढेल. संपत्तीत वाढ होईल.
मीन:- अनुकूल दिवस आहे. तुमच्याच राशीतील बुधशी चंद्राचा शुभ योग आहे. प्रवास कार्यसाधक होतील. मौल्यवान खरेदी होईल. मन आनंदी राहील.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी - 8087520521)