सोमवार, १४ एप्रिल २०२५. चैत्र कृष्ण प्रतिपदा/द्वितीया. विश्वावसुनाम संवत्सर. शके १९४७, संवत २०८१. वसंत ऋतू. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)
राहुकाळ - सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
"आज उत्तम दिवस आहे" डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती
नक्षत्र: स्वाती. आज जन्मलेल्या बाळाची राशी- तुळ. (वज्र योगाची शांती करून घेणे)
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) अनुकूल दिवस आहे. आवडती व्यक्ती भेटेल. स्पर्धेत यश मिळेल. नात्यातून लाभ होतील. कलाकारांना चांगला दिवस आहे.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) षष्ठ स्थानी चंद्र आहे. काही सुखद घटना घडतील. आर्थिक लाभ उत्तम होतील. व्यापार वाढेल. भेटवस्तू मिळतील.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) अनुकूल दिवस आहे. स्वप्ने साकार होतील. आर्थिक तरतूद होईल. लॉटरी मधून लाभ मिळू शकतात. मोठी जोखीम नको.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) उद्योग/व्यवसायात भरघोस वाढ होईल. जमीन व्यवहारात लाभ होतील. वाहन सुख लाभेल. प्रवास घडेल.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) तृतीय स्थानी चंद्र आहे. भरपूर आर्थिक लाभ होतील. अधिकार वाढतील. सामाजिक वजन वाढेल.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) चांगले अनुभव येतील. कामात प्रगती होईल. कलाकारांना संधी मिळतील. पैशांची तजवीज होईल. येणी वसूल होतील.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) अनुकूल ग्रहमान आहे. तुमच्याच राशीत चंद्र आहे. सुखद अनुभव येतील. मन आनंदी राहील. मेजवानी मिळेल.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) संमिश्र दिवस आहे. कामाचे नियोजन बदलले. जमीन व्यवहार पुढे ढकलले जातील. अपेक्षाभंग होऊ शकतो.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) अनुकूल दिवस आहे. मनासारखी कामे होतील. स्वप्ने साकार होतील. नवीन संधी चालून येतील. शेतीतून चालताना काळजी घ्या.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) व्यावसायिक वाढ होईल. कामाचा ताण वाढेल. मात्र नफा देखील वाढणार आहे. लेखकांना यश मिळेल.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) प्रसन्न ग्रहमान आहे. आर्थिक उलाढाल वाढेल. नवीन संधी प्राप्त होतील. पित्याकडून लाभ होतील.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) संमिश्र दिवस आहे. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. नवीन ओळखी होतील. केतूच्या नक्षत्रातील रवी कायदेशीर कटकटीं निर्माण करू शकतो.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी - 8087520521)