असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य १२ एप्रिल

असा  असेल  तुमचा आजचा दिवस  : राशिभविष्य  १२ एप्रिल
  • Positive News
  • एप्रिल 12 2025

Share on  

असा  असेल  तुमचा आजचा दिवस  : राशिभविष्य  १२ एप्रिल 

शनिवार, १२ एप्रिल २०२५. चैत्र पौर्णिमा. विश्वावसुनाम संवत्सर. शके १९४७, संवत २०८१. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)

राहुकाळ -  सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०

आज संध्याकाळी ५.०० नंतर चांगला दिवस आहे. हनुमान जयंती, वैशाख स्नानआरंभ

चंद्रनक्षत्र - हस्त/(संध्याकाळी ६.०६ नंतर) चित्रा.  आज जन्मलेल्या बाळाची राशी - कन्या. (व्यघात योग, विष्टी करण शांती करून घेणे)

टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्राचा गुरुशी त्रिकोण योग, तर सूर्याशी प्रतियुती आहे. आर्थिक चिंता मिटतील.  फायद्याचे करार होतील. मात्र कायदेशीर बाबीत बारीक लक्ष घालावे.
     
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) व्यवसाय वाढेल. नोकरीत मनासारख्या घटना घडतील. अचानक लाभ होतील. संतती बाबत खुश खबर मिळेल.
 
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) सुपीक जमिनीचे वरदान मिळेल. आजच्या कष्टाचे उत्तम फळ मिळेल. दान धर्म कराल. वक्तृत्व चमकेल.  

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) उद्योग व्यवसायात यश मिळेल. मनासारखी कामे पार पडतील. अनुकूल गुरू स्वप्ने साकार करतील. 
 
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) अडचणी दूर होतील. कुलदेवतेची कृपा राहील.  काही चांगले अनुभव येतील. प्रशासकीय कामे रेंगाळतील. 
  
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) व्यवसायासाठी अनुकूल ग्रहमान आहे. खरेदी होईल. स्वतःसाठी खर्च कराल. गुप्त शत्रूंचा त्रास जाणवेल. 
 
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) संमिश्र ग्रहमान आहे. मन साशंक राहील. चैनीवर खर्च कराल. षष्ठ स्थानात ग्रहांची मांदियाळी बसलेली आहे. अति जोखीम नको.
 
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) अनुकूल ग्रहमान आहे. रखडलेली कामे पूर्ण करा. प्रतिष्ठा सांभाळताना अनाहूत खर्च होईल. बोलताना कळजी घ्या.
 
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) नोकरीत बढती/बदली होईल. वरिष्ठांकडून लाभ होतील. मेहनत केल्यास उत्तम यश मिळेल. शेतीची कामे रेंगाळतील.
  
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) शुभ दिवस आहे. भ्रमंती घडेल. परदेश गमनाचे योग आहेत. मौल्यवान खरेदी होईल. 

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) अष्टम स्थानी चंद्र आहे. फारशी अनुकुलता नाही. कामे रेंगाळतील. चंद्र गुरू योगामुळे काही सुखद अनुभव येतील.
 
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) मन आनंदी राहील. नात्यातून सहकार्य मिळेल. उच्च शुक्र भौतिक सुखे प्रदान कारेन. मात्र मन भ्रमित करणाऱ्या घटना घडू शकतात. 

-सायन ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521.

संबंधित बातम्या