असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य ११ एप्रिल 

असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य ११ एप्रिल 
  • Positive News
  • एप्रिल 11 2025

Share on  

असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य ११ एप्रिल 

शुक्रवार, ११ एप्रिल २०२५. चैत्र शुक्ल चतुर्दशी. वसंत ऋतू. विश्वावसुनाम संवत्सर. शके१९४७, संवत २०८१.  राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)

राहू काळ - सकाळी १०.३० ते दुपारी १२.००

चंद्र नक्षत्र - उत्तरा. / (दुपारी ३.१० नंतर) हस्त. आज जन्मलेल्या बाळाची राशी - कन्या.

"आज उत्तम दिवस आहे." 

मेष:- चंद्राची नेमच्यूनशी प्रतियुती आहे. काळजीचे कारण नाही. व्यवसाय वाढेल. आज महत्वाची कामे पूर्ण करा. पाणथळ जागेजवळ गेल्यास अधिक काळजी घ्या.
     
वृषभ:- अनुकूल दिवस आहे. आर्थिक लाभ होतील. प्रिय व्यक्तीची भेट होईल. प्रेमात यश मिळेल. खुशखबर मिळेल.
 
मिथुन:- अनुकूल दिवस आहे. काही सुखद अनुभव येतील. घरातून उत्तम सहकार्य लाभेल.  सामाजिक कार्यात भाग घ्याल.

कर्क:-  अचानक धनलाभ संभवतो. अधिकार वाढतील. तुमच्या मताला किंमत मिळेल. जलपर्यटन घडेल. 
 
सिंह:- अर्थकारण भक्कम होईल. येणी वसूल होतील. कलाकारांना उत्तम यश मिळेल. बहुमान मिळेल.
  
कन्या:-  तुमच्याच राशीत चंद्र आहे. व्यावसायिक यश मिळेल. आर्थिक लाभ होतील. मन आनंदी राहील. मेजवानी मिळेल.
 
तुळ:-  संमिश्र दिवस आहे. यश मिळेल. कलाकारांना चांगला दिवस आहे. वक्तृत्व चमकेल. दूषित पाण्याचा धोका आहे.   
 
वृश्चिक:- अनुकूल दिवस आहे. व्यवसायात यश मिळेल. आत्मविश्वास वाढेल. भरभराट होईल. 

धनु:-  अनुकूल ग्रहमान आहे. कामाच्या ठिकाणी सुखद अनुभव येतील. प्रवासाचे नियोजन होईल. घरगुती प्रश्न सुटतील. 
 
मकर:- नवम स्थानी चंद्र आहे. बढतीचे योग आहेत. नोकरीत चांगल्या घटना घडतील. आकर्षणे समोर येतील मात्र काळजीपूर्वक निर्णय घेतला पाहिजे.
 
कुंभ:- संमिश्र ग्रहमान आहे.  अष्टम स्थानी चंद्र आहे. तरीही काही सुखद अनुभव येतील. पत्नीच्या नात्यातून लाभ मिळतील. नदी पार करताना काळजी घ्या.
 
मीन:- अनुकूल दिवस आहे. दानधर्म करा. तीर्थाटन घडेल. पत्नीचे उत्तम सहकार्य लाभेल. इतरांचा सल्ला घेतल्याने लाभ होऊ शकतो.

(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी -  8087520521)

संबंधित बातम्या