गुरुवार, १० एप्रिल २०२५. चैत्र शुक्ल त्रयोदशी. वसंत ऋतू, उत्तरायण, शके १९४७, संवत २०८१, विश्वावसुनाम संवत्सर. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)
राहुकाळ - दुपारी १.३० ते दुपारी ३.००
आज उत्तम दिवस आहे. प्रदोष, महावीर जयंती
चंद्रनक्षत्र - पूर्वा/उत्तरा. आज जन्मलेल्या बाळाची राशी - सिंह/ (संध्याकाळी ७.०५ नंतर) कन्या. (वृद्धी योग)
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) रवी ष चंद्र आहे. संध्याकाळी चंद्राचा मंगळाशी लाभ (शुभ) योग आहे मात्र बुध, शुक्र, शनिशी प्रतियुती आहे. जपून पावले टाका. सरकारी कामात दुर्लक्ष नको. हाडाचे विकार संभवतात. सध्या ग्रहमान फारसे अनुकूल नाही. काळजी घ्या.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो)
अनुकूल चंद्र - हर्षल योग अचानक लाभ करून देईल. कामाचा ताण कमी होईल. काही अनुकूल घटना घडतील. ग्रहमान प्रसन्न आहे. मान सन्मान मिळतील.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) अनुकूल हर्षल तुम्हाला नशीबवान आणि पराक्रमी बनवेल. आनंदी राहाल. कामाचा व्याप वाढेल. त्याचे चांगले फळ देखील मिळेल.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) संमिश्र दिवस आहे. काही सुखद अनुभव येतील. दूरच्या प्रवासाचे योग आहेत. ज्ञानपिपासा वाढेल.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) ग्रहमान फारसे अनुकूल नाही. सावधपणा आवश्यक आहे. मोठे व्यवहार करताना काळजी घ्या. विवेक शक्तीचा वापर करा.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) फारशी अनुकूलता नाही. संयम ठेवावा लागेल. अधिकारात वाढ होईल. आज मोठया अपेक्षा ठेवू नका.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) अनुकूल दिवस आहे. भागीदारी व्यवसायात यश मिळेल. शत्रू पराभूत होतील. मात्र संध्याकाळ काळजी आणि खर्च वाढवणारी असणार आहे.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) चंद्र अनुकूल आहे. मात्र बाकी ग्रहमान संमिश्र आहे. प्रतिष्ठा वाढेल. नोकरीच्या ठिकाणी सुखद अनुभव येतील. आरोग्याचे प्रश्न निर्माण होऊ शकतात. उगवत्या सूर्याला अर्घ्य द्या.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) नावलौकिक वाढेल. संपन्नता अनुभवाल. अचानक लाभ होतील. घरगुती कटकटिना सामोरे जावे लागू शकते. सामाजिक कार्यात विनाकारण जोखीम घेऊ नका.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) संमिश्र दिवस आहे. चिंता वाढवणारे ग्रहमान आहे. वारसा संपत्ती बाबत वाद निर्माण होऊ शकतात. ज्येष्ठ व्यक्तीची सेवा करा.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) सप्तम स्थानी चंद्र आहे. स्पर्धेत यश मिळेल. नात्यातून लाभ होतील. आर्थिक आवक आणि जावक सारखीच राहील.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) खर्च वाढतील. मात्र आवक देखील वाढेल. विनाकारण मोठेपणा मिरवू नका. फारशी अनुकूलता नाहीये. विवादास्पद प्रकरणात पडू नका.
- ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521