असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य ४ मे २०२६

असा असेल  तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य ४ मे  २०२६
  • Positive News
  • मे 4 2026

Share on  

सोमवार, ४ मे २०२६
वैशाख कृष्ण तृतीया
वसंत ऋतू
पराभव नाम संवत्सर
शके १९४८, संवत २०८२

राशिभविष्य – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
(संपर्क – 8087520521)

⏰ राहू काळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००

चंद्र नक्षत्र – अनुराधा / (सकाळी ९.५८ नंतर) जेष्ठ.
आज जन्मलेल्या बाळाची राशी – वृश्चिक. (विष्टी करण आणि परीघ योग शांती करून घेणे)

योग – परीघ योग
करण – विष्टी करण

"सकाळी १०.०० पर्यंत चांगला दिवस आहे."

ग्रहयोग – रवी ष चंद्र, चंद्र त्रिकोण मंगळ, चंद्र प्रतियुती शुक्र, चंद्र त्रिकोण शनी

???? मेष:-
दिवसाच्या सुरुवातीला कामे मार्गी लागतील. मात्र नंतर काही अडथळे येऊ शकतात. आर्थिक व्यवहारात सावध रहा. रागावर नियंत्रण ठेवा.

???? वृषभ:-
सकाळचा वेळ लाभदायक आहे. नंतर खर्च वाढू शकतो. कुटुंबात समन्वय राखा. गुंतवणूक करताना विचारपूर्वक निर्णय घ्या.

???? मिथुन:-
कामात प्रगती होईल. नवीन संधी मिळतील. मित्रांची साथ लाभेल. मात्र दुपारनंतर मानसिक ताण जाणवू शकतो.

???? कर्क:-
सकाळी लाभदायक योग आहे. नंतर कामात अडथळे येऊ शकतात. संयमाने वागा. वरिष्ठांशी वाद टाळा.

???? सिंह:-
भाग्याची साथ मिळेल. प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक कार्यात मन लागेल. दिवसाच्या उत्तरार्धात थोडा थकवा जाणवेल.

???? कन्या:-
संमिश्र दिवस आहे. आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक बाबतीत सावधगिरी आवश्यक आहे. गुप्त शत्रूंपासून जपून राहा.

⚖️ तुळ:-
संबंधांमध्ये गोडवा राहील. जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. व्यवसायात प्रगती होईल. मात्र अहंकार टाळा.

???? वृश्चिक:-
तुमच्या राशीत चंद्राचा प्रभाव आहे. मन प्रसन्न राहील. कामात यश मिळेल. सकाळी विशेष लाभदायक वेळ आहे.

???? धनु:-
कामात व्यस्त राहाल. आरोग्याची काळजी घ्या. सहकाऱ्यांशी मतभेद टाळा. मेहनतीचे चांगले फळ मिळेल.

???? मकर:-
सर्जनशील कामात यश मिळेल. प्रेमसंबंध दृढ होतील. मुलांकडून आनंद मिळेल. दिवस चांगला जाईल.

???? कुंभ:-
घरगुती कामात वेळ जाईल. मालमत्तेसंबंधी निर्णय घेऊ शकता. आई-वडिलांचे सहकार्य लाभेल.

???? मीन:-
संवादातून लाभ होईल. नवीन ओळखी निर्माण होतील. लहान प्रवास संभवतो. आत्मविश्वास वाढेल.

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521

कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521.

संबंधित बातम्या