महिलांसाठी ज्योतिष:-
सौ मधुरा मंगेश पंचाक्षरी नाशिक
मोबाइल 9272311600
रविवार, 3 मे 2026. वैशाख कृष्ण द्वितीया
राहुकाळ - दुपारी 4:30 ते संध्याकाळी 6
आज चांगला दिवस.
आज जन्मलेल्या बाळाची रास वृश्चिक.
3 मे रोजी जन्मलेल्या महिलांची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा ????
तुमच्यावर गुरु, बुध आणि शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमच्यात महत्त्वाकांक्षा, अभिमान ,तपस्या आहे. धर्मादाय संस्था ,मूकबधीर अपंगांकरता असलेल्या संस्थांमध्ये काम करण्याची आवड असते, त्यापासून कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा नसते .वयाच्या 30 वर्षानंतर भाग्योदय होतो. समाजप्रिय असून सिनेमा, नाटके, प्रवास इत्यादी गोष्टीची आवड असते .कला व संगीत यामध्ये गती असून घराची सजावट उत्तम रीतीने करता. महत्त्वकांक्षी असून मानसन्मान व प्रतिष्ठा या गोष्टीचे जपणूक करता .स्वतःच्या ज्ञानाविषयी आत्मविश्वास असतो .धर्माबद्दल ओढ असते परंतु त्याकडे डोळसपणे पाहता. दुसऱ्याच्या भल्यासाठी कष्ट घेता. अडचणीत आलेल्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करतात .तुम्हाला मोठ्याने बोलण्याची सवय असते. तुमच्यात दिमाख असून टापटीप ,व्यवस्थितपणा काटेकोरपणा आहे. तुमच्यातील कौशल्य बुद्धीत आणि कृतीत पण असते .तुम्हाला खेळण्याची हौस असते .हातातील कार्यात यश कसे मिळवावे , याचे नियोजन तुम्ही करता .गूढविद्येची आवड असते .तुमचा सहवास नेहमी उत्साहवर्धक असतो. उत्तम सल्लागार असून जीवनातील समस्यावर योग्य तो मार्ग शोधून काढतात. स्वतःच्या चाणाक्ष ,धूर्त स्वभावामुळे नोकरी उद्योग व्यवस्थित सांभाळता .स्वतःच्या कष्टाचा मोबदला चांगल्या रीतीने मिळवता. खर्चिक असून प्रिय व्यक्तीसाठी भरमसाठ खर्च करता .पैशामुळे जेवढे सुखे उपभोक्ता येतील त्या सर्वांचा आनंद लुटता .जीवन आरामदायी जाईल याकडे लक्ष असते. तुम्ही चलाख व आकर्षक व्यक्तिमत्त्वाच्या आहात .तुम्हाला घराबद्दल आपले पण आहे पण ओढा नाही .तुमची इच्छा शक्ती तीव्र अजून बुद्धी ,तल्लख असते. स्वभाव हरहुन्नरी आहे .लहरी असून कृतीने हळवे असता.आपल्या पतीला योग्य ती साथ देण्यात तुम्हाला अभिमान वाटतो .प्रेमळ व निष्ठावान असून चांगली सह धर्मचारणी म्हणून लौकिक मिळवता..
शुभ दिवस -मंगळवार, गुरुवार ,शुक्रवार
शुभ रंग :-पिवळा ,जांभळा हिरवा.
शुभ रत्ने :-पुष्कराज ,लसण्या.
आजचे राशिभविष्य
♈ मेष
मैत्रिणींनो आज अष्टमात चन्द्र आहे.
आज थोडी चिडचिड जाणवू शकते. कामात धैर्य ठेवा, घाईने निर्णय घेऊ नका. नात्यांमध्ये स्पष्ट संवाद गरजेचा आहे.
♉ वृषभ
मैत्रिणींनो आज
संबंधांमध्ये थोडा ताण येऊ शकतो, पण संयम ठेवल्यास परिस्थिती सुधारेल. आर्थिक बाबतीत विचारपूर्वक पावले उचला.
♊ मिथुन
मैत्रिणींनो आज
कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील. थोडा ताण येईल, पण तुमच्या कौशल्याने तुम्ही ते नीट हाताळाल.
♋ कर्क
मैत्रिणींनो आज
संतती ची चिंता वाटेल. कुटुंबाकडून आधार मिळेल. सर्जनशील कामांसाठी चांगला वेळ.
♌ सिंह
मैत्रिणींनो आज
घरगुती बाबींमध्ये थोडे मतभेद होऊ शकतात. शांत राहून परिस्थिती हाताळा. मन स्थिर ठेवणे आवश्यक.
♍ कन्या
मैत्रिणींनो आज
संवादातून गैरसमज निर्माण होऊ शकतात, त्यामुळे बोलताना शब्द जपून वापरा. शिक्षण व अभ्यासासाठी दिवस ठीक आहे.
♎ तुळ
मैत्रिणींनो आज
आर्थिक बाबींमध्ये सावधगिरी बाळगा. खर्च वाढू शकतो. स्वतःच्या मूल्यांची जाणीव ठेवा.
♏ वृश्चिक
मैत्रिणींनो आज चन्द्र तुमच्या च राशीत आहे.
आज तुमचा उत्साह जास्त असेल, पण भावनांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. निर्णय घेताना विचार करा.योग्य मार्गदर्शन घ्या.
♐ धनु
मैत्रिणींनो आज व्यय स्थानी चन्द्र आहे.थकवा जाणवेल.आरामाची गरज भासेल.
मनात अस्वस्थता जाणवू शकते. एकांतात वेळ घालवणे फायदेशीर ठरेल. आध्यात्मिक गोष्टींकडे ओढ वाढेल.
♑ मकर
मैत्रिणींनो आज मैत्र मंडळीकडून मदत मिळेल.भेट घडेल.गप्पा रंगतील. नवीन योजना आखण्यासाठी योग्य वेळ आहे. संयम ठेवा.
♒ कुंभ
मैत्रिणींनो आज
कामात प्रगती होईल, पण वरिष्ठांशी मतभेद टाळा. जबाबदारीने वागा.
♓ मीन
मैत्रिणींनो आज
नवीन संधी मिळू शकतात. प्रवासाचे योग आहेत. सकारात्मक दृष्टी ठेवा.
सौ मधुरा मंगेश पंचाक्षरी नाशिक
मोबाईल 9272311600
लग्न ,करियर, गुण मीलन विषयी
सशुल्क पत्रिका पाहण्यासाठी संपर्क करावा.