असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य २ मे २०२६

असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य २ मे २०२६
  • Positive News
  • मे 2 2026

Share on  

शनिवार, २ मे २०२६
वैशाख कृष्ण प्रतिपदा
वसंत ऋतू
पराभव नाम संवत्सर
शके १९४८, संवत २०८२

राशिभविष्य – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
(संपर्क – 8087520521)

⏰ राहुकाळ – सकाळी ९.०० ते १०.३०

“आज वर्ज्य दिवस आहे”

नक्षत्र – विशाखा. आज जन्मलेल्या बाळाची राशी – तुळ. (व्यतिपात योग् शांती)

ग्रहयोग:
चंद्र त्रिकोण गुरू

२ मे रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-

     तुमच्यावर चंद्र, शुक्र आणि बुध या ग्रहांचा प्रभाव आहे. दुसऱ्याच्या सूचनेनुसार तुम्ही अधिक चांगले काम करतात. अर्थात तुमचे स्वतंत्र विचार असतात परंतु इतरांचे विचार प्रत्यक्षात आणणे तुम्हाला अधिक आवडते. तुम्ही गर्दीत रमतात. तुम्हाला नवनवीन गोष्टींची आवड असते. प्रवास करणे आवडते. तुम्ही अत्यंत बुद्धिमान, चतुर आणि शास्त्राची आवड असणाऱ्या अहहत. तुमच्या संपर्कात येणारी व्यक्ती उत्साहित होते. तुम्ही आदर सहानुभूती आणि प्रेमाला जास्त महत्त्व देतात. तुमची इतरांवर चटकन छाप पडते. तुमचं मित्र मंडळ मोठ असतं आणि त्यांच्यासाठी तुम्ही मदतीला तयार असतात. योग्य आणि अयोग्य याची निवड तुम्ही सहज करू शकतात. तुमच्यात उत्तम कल्पनाशक्ती आहे. तुम्ही स्वातंत्र्यप्रिय आहात. सतत तुम्ही कार्यमग्न असतात. तुम्ही नम्र आहात मात्र आपले कौतुक व्हावे असे तुम्हाला मनापासून वाटते. तुमच्या वयापेक्षा अधिक वयाच्या लोकांकडे तुम्ही आकर्षित होतात.

व्यवसाय:- बँकिंग, वकील, न्यायाधीश, चार्टर्ड अकाउंटंट, सचिव, लेखन, वक्ते.

शुभ दिवस:- सोमवार, मंगळवार, शुक्रवार.

शुभ रंग:- पांढरा.

शुभ रत्न:- पाचू, मोती, हिरा.

♈ मेष:-(चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ)

आज वर्ज्य दिवस असल्याने महत्त्वाचे निर्णय टाळा. चंद्र-गुरू त्रिकोणामुळे मानसिक आधार मिळेल. खर्च वाढू शकतो.

♉ वृषभ:-(इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)

मित्रांकडून मदत मिळेल. आर्थिक लाभाचे योग आहेत. मात्र नवीन गुंतवणूक टाळावी.

♊ मिथुन:-(का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा)

कामात स्थिरता राहील. वरिष्ठांचा सहकार्य मिळेल. संवादात स्पष्टता ठेवा.

♋ कर्क:-(हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो)

धार्मिक कार्यात मन रमेल. प्रवासाचे योग संभवतात. मानसिक शांतता लाभेल.

♌ सिंह:-(मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे)

संयमाने वागा. वाद टाळा. चंद्र-गुरू योगामुळे उत्तरार्धात लाभ मिळेल.

♍ कन्या:-(टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो)

कामात यश मिळेल. आर्थिक बाबतीत सुधारणा होईल. आरोग्याकडे लक्ष द्या.

♎ तुळ:-(रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते)

चंद्र राशीत असल्याने आत्मविश्वास वाढेल. मात्र वर्ज्य दिवस असल्याने नवीन काम सुरू करू नका.

♏ वृश्चिक:-(तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु)

मनात अस्थिरता जाणवेल. संयम आवश्यक आहे. उत्तरार्धात परिस्थिती सुधारेल.

♐ धनु:-(ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे)

भाग्याची साथ मिळेल. धार्मिक कार्यात सहभाग वाढेल. आर्थिक लाभ संभवतो.

♑ मकर:-(भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी)

कामाचा ताण राहील. कुटुंबातून सहकार्य मिळेल. नियोजन करून काम करा.

♒ कुंभ:-(गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा)

मित्रांचा सहकार्य मिळेल. नवीन योजना आखाल. खर्चावर नियंत्रण ठेवा.

♓ मीन:-(दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची)

ग्रहमान अनुकूल आहे. मन प्रसन्न राहील. सर्जनशील कामात यश मिळेल.

(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, "राशीभाव" या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी - 8087520521)

कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521

संबंधित बातम्या