असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य ५ जुलै

असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य ५ जुलै
  • Positive News
  • जुलै 5 2025

Share on  

शनिवार, ५ जुलै २०२५. आषाढ शुक्ल दशमी/एकादशी. विश्वावसुनाम संवत्सर. शके १९४७, संवत २०८१. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)

राहुकाळ - सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०

"आज रात्री ८.०० पर्यंत चांगला दिवस आहे" 

नक्षत्र: स्वाती/ (रात्री ७.५१ नंतर) विशाखा. आज जन्मलेल्या बाळाची राशी- तुळ. 

टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्राचा मंगळ आणि रवीशी शुभ योग आहे. अनुकूल दिवस आहे. आवडती व्यक्ती भेटेल. नात्यातून लाभ होतील. आज विशेष पराक्रम कराल. सरकारी कामात यश मिळेल. सौख्य लाभेल. मास्टर पाळीव पशूंपासून सावध रहा.

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
     
वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) षष्ठ स्थानी चंद्र आहे. काही सुखद घटना घडतील. आर्थिक लाभ उत्तम होतील. व्यापार वाढेल. भेटवस्तू मिळतील. सोशल मेडियवर व्यक्त होताना काळजी घ्या. 
 
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) उत्तम दिवस आहे. स्वप्ने साकार होतील. आर्थिक तरतूद होईल. लॉटरी मधून लाभ होऊ शकतात. प्रेमात यश लाभेल. बोलताना काळजी घ्या. 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) उद्योग/व्यवसायात भरघोस वाढ होईल. प्रगतीची नवी दालने खुली होतील. जमीन व्यवहारात लाभ होतील. एखाद्या चुकीबद्दल आज माफी मिळेल. काही चुकीचे निर्णय होऊ शकतात.
 
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) तृतीय स्थानी चंद्र आहे. भरपूर आर्थिक लाभ होतील. अधिकार वाढतील. सामाजिक वजन वाढेल. तुम्हाला स्तुती केलेली आवडते. आज तुमचे कौतुक होईल. मौल्यवान वस्तूची दुरुस्ती करावी लागेल.
  
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) चांगले अनुभव येतील. कामात प्रगती होईल. कलाकारांना संधी मिळतील. पैशांची तजवीज होईल. वरिष्ठ खुश होतील. सरकारी नोकरदारांना चांगला दिवस आहे.  

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) अजूनही तुमच्याच राशीत चंद्र आहे. अनुकूल ग्रहमान आहे. सुखद अनुभव येतील. मन आनंदी राहील. घरातील ज्येष्ठ व्यक्तीचे आशीर्वाद मिळतील. भाग्योदय होईल. अनुकूल मंगळ तुम्हाला मनासारखे यश देईन. 
 
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) संमिश्र दिवस आहे. कामाचे नियोजन बदलले तरीही अंतिमतः ते तुमच्या फायद्याचे आहे. जमीन व्यवहार पुढे ढकलले जातील. प्रशासकीय कामे पुढे ढकलली जातील.  

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) अकरावा चंद्र आहे. अनुकूल दिवस आहे. मनासारखी कामे होतील. स्वप्ने साकार होतील. नवीन संधी चालून येतील. शत्रू माघार घेतील. व्यावसायिक स्पर्धेत तुम्हाला यश मिळेल.

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
 
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) व्यावसायिक वाढ होईल. कामाचा ताण वाढेल. मात्र नफा देखील वाढणार आहे. विजयश्री प्राप्त होईल. पीडा टळेल.
 
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) प्रसन्न ग्रहमान आहे. आर्थिक उलाढाल वाढेल. नवीन संधी प्राप्त होतील. धार्मिक कामातून यश मिळेल. कार्यकुशलता वाढेल. न्यायी भूमिका घ्याल.
 
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) संमिश्र दिवस आहे. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. नवीन ओळखी होतील. एखादी विशेष पदवी प्राप्त होईल. नवीन घरबांधणी संबंधात निर्णय होईल. 

व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521

संबंधित बातम्या