मंगळवार, १ एप्रिल २०२५. चैत्र शुक्ल चतुर्थी. वसंत ऋतू, उत्तरायण. विश्वावसूनाम संवत्सर. शके १९४७, संवत २०८१. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)
राहुकाळ - दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०
आज सकाळी ११.०० पर्यंत चांगला दिवस आहे. विनायक चतुर्थी (अंगारकी योग)
चंद्रनक्षत्र - भरणी(शुक्र)/कृतिका (रवी) आज जन्मलेल्या बाळाची राशी - मेष. / (दुपारी ४.३० नंतर) वृषभ.
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्र लाभ बुध,शुक्र, शनी, मंगळ, नेपच्यून. चंद्र युती हर्षल. तुमच्याच राशीत चंद्र आहे. अनुकूल दिवस आहे. महत्वाची कामे आज पूर्ण करा. दुपारनंतर अनुकूलता वाढीस लागेल. शब्दास मान मिळेल कर्जे मंजूर होतील. संपत्ती वाढेल. खर्च झाला तरी तो योग्य कारणासाठी होईल.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो)
सकाळी व्यय स्थानी चंद्र आहे. मात्र काळजी नको. कधी नव्हे ते सहा ग्रह अनुकूल आहेत. दुपारनंतर अनुकूलतेचा भरभरून प्रत्यय येईन. स्वप्ने साकार होतील. भौतिक सुखे प्राप्त होतील. भरभराट होईल. गूढ उलगडतील.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) कामाच्या ठिकाणी चांगले अनुभव येतील. चैनीवर खर्च कराल. दीर्घकालीन परिणाम करणाऱ्या घटना घडतील.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) चंद्र अनुकूल आहे. नवम स्थानी ग्रहांची सभा भरलेली आहे. चांगला दिवस आहे. प्रगती होईल. लक्ष्मी प्रसन्न होईल. मन आनंदी राहील. प्रवासाचे नियोजन होईल.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) दूरगामी सुखद परिणाम करणारे ग्रहमान आहे. दूरचे प्रवासाचे नियोजन कराल. आध्यत्मिक उंची वाढेल. सरकार दरबारी मान्यता वाढेल. एखादी अप्रिय बातमी कानी पडू शकते.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) संमिश्र दिवस आहे. सुरुवात फारशी आशादायक नसली तरी नंतर आर्थिक प्रगती बऱ्यापैकी होणार आहे. भागीदारी व्यवसायात यश मिळेल. विवाह इच्छुकांना चांगली बातमी समजेल.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) अनुकूल दिवस आहे. प्रेमात यश लाभेल. मन प्रसन्न राहील. आर्थिक प्रगती होईल. आनंदाची झुळूक अनुभवाल.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) छान दिवस आहे. ग्रहमानाचा आनंद घ्याल. दूरचे प्रवास घडतील. प्रेमात यश मिळेल. गुंतवणुकीतून लाभ होतील.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) महत्वाचे निर्णय घ्यावेत. आज आर्थिक प्रगती होईल. करार होतील. नावलौकिक वाढेल. व्यवसायात वाढ होईल.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) ग्रहमान अनुकूल आहे. कौटुंबिक कामात वेळ जाईल. स्वप्ने साकार होतील. सामाजिक कार्य कराल. नात्यातून लाभ होतील.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) अनुकूल दिवस आहे. उद्योग/ व्यवसायात उत्तम प्रगती होईल. आर्थिक भरभराट होईल. कलाकारांना उत्तम दिवस आहे.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) तुमच्या राशीत सध्या ग्रहांचे संमेलन भरलेले आहे. बौद्धिक प्रांतात मुशाफिरी कराल. मन प्रसन्न राहील. प्रिय व्यक्तीची भेट होईल. व्यवसाय वाढेल.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी - 8087520521)