असा असेल तुमचा आजचा गुढीपाडव्याचा दिवस : राशिभविष्य ३० मार्च

असा असेल तुमचा आजचा गुढीपाडव्याचा दिवस :   राशिभविष्य ३० मार्च
  • Positive News
  • मार्च 30 2025

Share on  

रविवार, ३० मार्च २०२५. चैत्र शुक्ल प्रतिपदा.शके १९४७, संवत २०८१. वसंत ऋतू, विश्वावसुनाम संवत्सर. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)

राहुकाळ - दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००

"आज शुभ दिवस आहे" गुढी पाडवा, अभ्यंगस्नान, संवत्सर आरंभ, पंचांग पूजन, विश्व ज्योतिष दिन श्रीराम नवरात्र आरंभ, वासंतिक देवी नवरात्र आरंभ, शंकर पर्वतीस दवणा वाहणे, कडू निंबाचे चूर्ण खाणे.  

नक्षत्र: रेवती/अश्विनी. आज जन्मलेल्या बाळाची राशी- मीन/ (दुपारी ४.३५ नंतर) मेष.

टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्र मंगळ केंद्र योग आहे. आर्थिक चिंता मिटतील. वक्तृत्व गाजेल. स्पष्ट भूमिका घ्याल. कोणाचेही मन दुखवू नका.
     
वृषभ:-(इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) दिवसाची सुरुवात चांगली होणार आहे. कामाला वेग येईल. दुपार नंतर आळस येईल. खर्च वाढेल.
 
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) दुपार नंतर अनुकूल दिवस आहे. सुरुवात संथ होणार आहे. मात्र नंतर उत्साह वाढेल. क्रोधावर नियंत्रण ठेवा. 

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) नोकरीच्या ठिकाणी चांगले अनुभव येतील. शुभ कर्मे घडतील. नैतिक अधिष्ठान लाभेल. प्रवास घडतील. वादविवाद टाळा.
 
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) सुरुवात फारशी अनुकूल नाही. आर्थिक लाभ वाढतील. प्रवास होतील. उच्च शिक्षणात यश. सामाजिक क्षेत्र गाजवाल. वाहन जपून चालवा.  
  
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) संमिश्र दिवस आहे. सुरुवात उत्तम होणार आहे. वेगवान प्रगती होईल. संध्याकाळ नंतर एखादी अप्रिय घटना घडू शकते.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) व्यावसायिक लाभ होतील. संध्याकाळ नंतर काही चांगल्या घटना घडतील. वेगवान घडामोडी घडतील. प्रवासात अडथळे. 
 
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) दिवस अनुकूल आहे. गुंतणुकीतून लाभ मिळतील. पशु लाभ होईल. जमीन व्यवहारातून मोठा फायदा होईल. 

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे)  सर्व सामान्य दिवस आहे. घरगुती कामासाठी वेळ द्यावा लागेल. रखडलेली कामे आज पूर्ण करा. प्रवास घडतील.
 
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) तृतीय आणि चतुर्थ चंद्र संध्याकाळी घरगुती कामात अडकवून ठेवेल. कौटुंबिक कामासाठी भ्रमंती घडेल. व्यापारात उत्तम यश मिळेल.
 
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) अनुकूल दिवस आहे. कामाचा ताण वाढेल. जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील. खर्च वाढेल. संध्याकाळ आनंदाची. 
 
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) उत्साही दिवस आहे. वाहन सुख लाभेल. सहकार्य मिळेल. संधी चालून येतील. मात्र शत्रूत्रास जाणवेल.   

(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी -  8087520521)

संबंधित बातम्या