असा असेल तुमचा आजचा दिवस  :  राशिभविष्य ९ जून

असा असेल तुमचा आजचा दिवस  :  राशिभविष्य ९ जून
  • Positive News
  • जून 9 2025

Share on  

असा असेल तुमचा आजचा दिवस  :  राशिभविष्य ९ जून

९ जून रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-

     तुमच्यावर मंगळ, बुध आणि शुक्र या ग्रहांचा प्रभाव. आहे तुम्ही आक्रमक, धाडसी, तडफदार आणि लढाऊ वृत्तीचे आहात. तुम्ही महत्त्वाकांक्षी आहात आणि तुमच्या कर्तृत्वाबद्दल तुम्हाला पुर्ण विश्वास आहे. तुम्हाला आयुष्यात मोठा अधिकार आणि मानसन्मान मिळतात. तुम्हाला शक्तिशाली खेळांची आणि व्यायामाची आवड आहे. इतरांवर तुम्ही दया करतात मात्र त्यातून तुम्हाला एक प्रकारचा आनंद मिळतो. आजारी लोकांना तुम्ही स्वतःचे क्षमतेने बरे करू शकतात. तुम्ही शीघ्रकोपी आहात मात्र स्वतःच्या मनावर ताबा ठेवू शकतात. बौद्धिक क्षेत्रात काम करणे तुम्हाला आवडते. तुमचे विचार ठाम आहेत. तुम्हाला तुमची मुले आणि बहिणी जास्त प्रिय असतात. तुम्ही कायदा प्रेमी आहात. जबाबदारीच्या जागांवर तुम्ही काम करू शकतात. तुमची मनाची शक्ती अफाट असून तुम्हाला गूढ अनुभव येतात. तुम्हाला प्रवासातून अनेक अनुभव येतात आणि त्यामुळे तुमचे जीवन परिपक्व होते. तुम्ही अभ्यासू वृत्तीचे आहात. इतरांच्या पेक्षा तुमचे विचार पुढे असतात. तुम्ही तुमच्या मतांशी ठाम असतात. विनाकारण इतरांची खोडी काढणे तुम्ही टाळले पाहिजे. आयुष्यात अहंकार आणि पोकळ दिमाख याला काही अर्थ नाही. तुम्ही बोलण्यामध्ये आणि वक्तृत्वात प्रवीण आहात. स्वतःची चूक तुम्ही कधीही मान्य करत नाहीत. इतरांवर टीका करणे टाळल्यास तुम्ही अधिक प्रगती करू शकाल.

व्यवसाय:-  हॉटेल व्यवस्थापन, संगीतकार, दाग-दागिने विक्री, बेकरी, गृहसजावट, पोलीस, मिल्ट्री, डॉक्टर, केमिस्ट, लोखंड, बांधकाम क्षेत्र, इंजिनिअर.

शुभ दिवस:- सोमवार, मंगळवार, गुरुवार.

शुभ रंग:- राखाडी.

शुभ रत्न:- पाचू, पुष्कराज, मोती माणिक.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)

व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या

कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521
सोमवार, ९ जून २०२५. ज्येष्ठ शुक्ल त्रयोदशी/चतुर्दशी. विश्वावसुनाम संवत्सर. शके १९४७, संवत २०८१.   राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)

राहुकाळ - सकाळी ७.३० ते सकाळी ९.००

"आज दुपारी ४.०० नंतर चांगला दिवस आहे" 

चंद्रनक्षत्र - विशाखा/ अनुराधा. आज जन्मलेल्या बाळाची राशी -  तुळ/ (रात्री ८.५१ नंतर) वृश्चिक. 

टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या फेसबुक पेजला भेट द्या.

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) फारशी अनुकूलता नाही. तरीही काही धाडसी निर्णय घ्याल. मोठी जोखीम टाळा. स्पर्धा जाणवेल. व्यसने नकोत. 
       
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) आर्थिक लाभ होतील. कुटुंब सुख लाभेल. मन आनंदी राहील. कामात काही बदल घडतील. शत्रू पराभूत होतील. 
 
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) संमिश्र दिवस आहे. व्यापार उदीम वाढेल. भरभराट होईल. दुपारनंतर आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) बौद्धिक क्षेत्र गाजवाल. वेगळ्या वाटेने जाल. गृह सजावट कराल. शेतीतून लाभ होतील. कठोर बोलणे टाळा.
    
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) सुरुवातीला आर्थिक लाभ होतील. व्यवसायात वाढ होईल. शेतीच्या कामात वेळ जाईल. नेतृत्व करताना काळजी घ्या. 
  
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) संमिश्र ग्रहमान आहे. मनासारखी कामे होतील. मौल्यवान खरेदी कराल.  व्यापार वाढेल.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) गुंतागुंतीचा दिवस आहे. आत्मविश्वास वाढेल. मेजवानी मिळेल. कौटुंबिक सुखात काहीशी कमतरता जाणवेल.
   
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) संमिश्र दिवस आहे. सुरुवात काहीशी निराशाजनक असू शकते. नंतर काही सुखद अनुभव येतील. वरिष्ठ खुष होतील. 
 
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) अनुकूल सुरुवात आहे. मनासारखी कामे होतील. संध्याकाळ खर्चात टाकणारी असू शकते.
 
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) अनुकूल दिवस आहे. धन धान्य वाढेल. आध्यत्मिक लाभ होतील. अनुकूल चंद्र आनंद आणि उत्साह वाढता ठेवेल.
 
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) सकाळी नवम स्थानी चंद्र आहे. धार्मिक कार्य करण्यास उत्तम कालावधी आहे. संध्याकाळी काही महत्वाचे काम निघू शकते.
 
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) संमिश्र दिवस आहे. नेहमीची कामे चालू ठेवा. ज्येष्ठ व्यक्तीकडून लाभ होतील. संध्याकाळ आनंदाची.   

 - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521
 

संबंधित बातम्या