आजचे राशिभविष्य आणि शेवटी आज जन्मलेल्या आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांची वैशिष्ट्ये:-
शनिवार, १९ जुलै २०२५. आषाढ कृष्ण नवमी/दशमी. विश्वावसुनाम संवत्सर. शके १९४७, संवत २०८१. वर्षा ऋतू. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)
राहुकाळ - सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०
"आज चांगला दिवस आहे"
नक्षत्र: भरणी. आज जन्मलेल्या बाळाची राशी- मेष. (शूल योग शांती)
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्राचा मंगळाशी त्रिकोण योग तर बुधाशी केंद्र योग आहे. धाडस करण्याची इच्छा होईल. कौटुंबिक सौख्य लाभेल. आवडते छंद जोपासले जातील. तंत्रज्ञानाचा योग्य वापर कराल. पाळीव पशूंपासून त्रास संभवतो.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) संमिश्र दिवस आहे. व्यय स्थानी चंद्र आहे. व्यावसायिक प्रगती होईल. कुटुंबासाठी खरेदी होईल. प्रिय व्यक्ती साठी वेळ द्यावा लागेल. मन प्रफुल्लित राहील. एखादा अपमानाचा प्रसंग येऊ शकतो.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) अनुकूल दिवस आहे. प्रवासात आनंद मिळेल. मानसिक सौख्य लाभेल. मनाची स्थिरता वाढेल. शब्द जपून वापरा. महत्वाकांक्षा वाढेल. पराक्रम गाजवाल. भावंडांचे सुख लाभेल.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) दिवस अनुकूल आहे. मनासारखी कामे पार पडतील. प्रवास घडतील. व्यावसायिक लाभ होतील. तुमच्या बोलण्याला धार चढेल. मात्र एखादा चुकीचा निर्णय घेतला जाऊ शकतो.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) दूरचे प्रवास संभवतात. आर्थिक लाभ होतील. नवीन संधी चालून येतील. खुशखबर मिळेल. दैवी शक्तीचा अनुभव येईल. वाहन किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तूच्या दुरुस्तीवर खर्च करावा लागेल.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) संमिश्र दिवस आहे. अष्टम स्थानी चंद्र आहे. कामाचा पसारा वाढेल. आर्थिक लाभ होतील. विनाकारण चिंता निर्माण होतील. जुनी येणी वसूल होतील.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) आर्थिक दृष्टीने अनुकूल दिवस आहे. सप्तम स्थानी चंद्र आहे. सौख्य लाभेल. कठोर मेहनत केल्यास उत्तम लाभ होतील. कोर्ट कामात यश मिळेल. शत्रू पराभूत होतील. जुने वाद मिटतील.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) गुंतणुकीतून लाभ मिळतील. कनिष्ठ व्यक्तीची साथ लाभेल. नोकरीच्या ठिकाणी चांगले अनुभव येतील. व्यापार वाढेल. प्रवासात त्रास होऊ शकतो योग्य काळजी घ्या.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) नोकरी/ व्यवसायात अनुकूलता वाढेल. आर्थिक लाभ होतील. सौख्य लाभेल. गुंतवणूक वाढेल. नात्यात विनाकारण गैरसमज होऊ शकतात. नदी पार करताना काळजी घ्या.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) अनुकूल दिवस आहे. शेतीतून लाभ होतील. वाहन सौख्य लाभेल. खरेदी - विक्रीतून लाभ होतील. वैवाहिक जोडीदाराला वेळ द्यावा लागेल. अचानक धनलाभ संभवतो.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) तृतीय चंद्र आहे. छोटे प्रवास घडतील. व्यवसायासाठी अनुकूल दिवस आहे. अनोळखी व्यक्तीशी संबंध येईल. वादविवाद होतील मात्र तुमची बाजू योग्य असणार आहे. चोरीचे भय आहे. नोकरांकडून त्रास सांभावतो.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची)आर्थिक चिंता कमी होऊ लागतील. मनासारखी कामे होतील. आर्थिक नियोजन करा. मित्रांकडून सहकार्य मिळेल. प्रवासात त्रास संभवतो. प्रतिकार शक्ती वाढेल.
ज्योतिषाचार्य मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521.
१९ जुलै रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा ????
तुमच्यावर रवि,चंद्र आणि नेपच्यून या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमच्या जीवनावर एक प्रकारची गुप्ततेची सावली पडलेली असते. याचे बीज भूतकाळात असते .गुप्त शत्रूंपासून धोका असतो. विविध खेळाची आवड असते. तुमच्या हट्टीपणामुळे इतरांबरोबर सहकार्य करणे तुम्हाला जरा कठीणच जाते. दुसऱ्यांच्या गुप्त गोष्टींचा स्फोट तुम्ही कधी करत नाही. तुमचे विचार आणि वागण्याचा प्रकार हे समजून घेणे इतरांना कठीण जाते. तुमचे निरीक्षण सूक्ष्म असत. बारीक सारीक गोष्टी सुद्धा तुमच्या नजरेतून सुटत नाहीत. तुम्ही तुमचे विचार लिखाणातून अधिक चांगल्या प्रकारे प्रकट करू शकता. प्रगती व यश हे तुमच्या जीवनाचे वैशिष्ट्य आहे. तुमच्यात उज्वल राष्ट्रभक्ती असून घराकडे अधिक ओढ असतो .शांत प्रवृत्तीचे असून भिडस्त स्वभाव असतो.हळवे असून प्रत्यक्षात इतरांना विरोधाभास जाणवतो. तुमची इच्छा असो व नसो तुम्हाला लोकप्रियताही मिळतेच. तुम्ही निस्वार्थी व प्रामाणिक असून बचतीचा कडे कल असतो. अंर्तमनात तुम्ही धार्मिक वृत्तीचे आहात परंतु त्याचा गाजावाजा केलेला आवडत. नाही स्वतंत्र वृत्ती असून महत्वकांक्षी असतात .सतत बदल करण्याची वृत्ती असल्याने कोणत्याही गोष्टी फार काळ रमत नाही .उद्योग प्रिय असून सतत कामात मग्न राहणे प्रिय असते .प्रत्येक बाबतीत डोळस दृष्टिकोनातून पाहण्याकडे कल असतो. दुसऱ्याला मार्गदर्शन करायला फार आवडते .व्यवहार दक्ष असता परंतु काही वेळा ध्येयवादी पण असतात. कलेबद्दल आकर्षण असून त्यात उत्साहाने भाग घेता .तुम्ही तुमच्या स्वतःच्या कामात रमता आणि त्यावर खुशही असतात. तुमच्यात निष्ठा, सहानुभूती व सहकार्य आहे. काही वेळा तुम्ही अतिशय लहरी आणि चमत्कारिक अस्वस्थ असतात. त्यामुळे स्वतःला व इतरांनाही त्याचा त्रास होतो .तुमच्या वागण्यामध्ये दिमाख असून इतरांना आकर्षण घेण्याचे सामर्थ्य असते ,त्यामुळे इतरांना तुमच्याबद्दल आदर वाटतो.
शुभ दिवस :-
रविवार ,सोमवार, बुधवार गुरुवार
शुभ रंग- पिवळा, सोनेरी केशरी
शुभ रत्ने :- माणिक,पाचू ,चंद्रमणी.
( रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521.