असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य  गुरुवार, २६ फेब्रुवारी २०२६

असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य  गुरुवार, २६ फेब्रुवारी २०२६
  • Positive News
  • फेब्रुवारी 26 2026

Share on  

असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य  गुरुवार, २६ फेब्रुवारी २०२६


फाल्गुन शुक्ल दशमी. विश्वावसुनाम संवत्सर. शके १९४७, संवत २०८२.
राशिभविष्य – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521)

 राहुकाळ – दुपारी १.३० ते दुपारी ३.००

 चंद्र नक्षत्र – मृगशीर्ष / (दुपारी १२.१२ नंतर) आर्द्रा
 आजचा दिवस – उत्तम दिवस.
 विशेष योग – रवी त्रिकोण चंद्र, चंद्र केंद्र शनी, चंद्र केंद्र नेपच्यून.
 निर्णयक्षमता, कल्पकता आणि जबाबदारी यांचा सुंदर संगम आज अनुभवास येईल.

 मेष (चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ)

रवी-चंद्र त्रिकोणामुळे आत्मविश्वास वाढेल. कार्यक्षेत्रात वरिष्ठांकडून कौतुक होईल. प्रवास लाभदायक ठरेल. आर्थिक नियोजन यशस्वी होईल. दुपारनंतर थोडी अस्वस्थता जाणवू शकते, संयम ठेवा.

 वृषभ (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)

आज मन प्रसन्न राहील. धनलाभाचे योग आहेत. नवीन संधी मिळतील. घरात आनंदाचे वातावरण राहील. गुंतवणुकीसाठी दिवस चांगला आहे. दुपारी १२ नंतर निर्णय सावधगिरीने घ्या.

 मिथुन (का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा)

मृग नक्षत्रामुळे बौद्धिक कार्यात यश. लेखन, शिक्षण, व्यवहार यांत प्रगती होईल. मित्रांकडून मदत मिळेल. दुपारनंतर भावनिक चढउतार संभवतात. गैरसमज टाळा.

 कर्क (हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो)

चंद्र केंद्र शनीमुळे जबाबदाऱ्या वाढतील. कौटुंबिक विषयात महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागेल. आर्थिक लाभ होईल, परंतु खर्चही वाढेल. संयम आणि शिस्त ठेवा.

 सिंह (मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे)

प्रतिष्ठा वाढविणारा दिवस. समाजात मान-सन्मान मिळेल. नवीन खरेदी संभवते. दुपारनंतर भावनिक प्रतिक्रिया देऊ नका. वरिष्ठांची साथ लाभेल.

 कन्या (टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो)

कामात बारकाई ठेवल्यास यश निश्चित. आरोग्याची काळजी घ्या. आध्यात्मिक कल वाढेल. दुपारनंतर प्रवास टाळावा. आर्थिक लाभ मध्यम राहील.

तुळ (रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते)

रवी-चंद्र योगामुळे भाग्य साथ देईल. व्यवसायात वाढ संभवते. जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. महत्त्वाचे करार आज पूर्ण करू शकता.

वृश्चिक (तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु)

गुप्त योजना यशस्वी होतील. शत्रूंवर मात कराल. आरोग्य सुधारेल. दुपारनंतर मानसिक ताण वाढू शकतो. ध्यान-प्रार्थना उपयुक्त ठरेल.

धनु (ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे)

आज संधींचा दिवस आहे. शिक्षण व स्पर्धेत यश मिळेल. कोर्ट-कचेरीच्या कामात सकारात्मक घडामोडी होतील. प्रवास लाभदायक ठरेल.

 मकर (भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी)

कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील. खर्चाचे प्रमाण वाढेल. मात्र चंद्र-शनी योगामुळे स्थैर्य लाभेल. स्थावर मालमत्तेबाबत चर्चा यशस्वी होईल.

कुंभ (गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा)

बौद्धिक कार्यात प्रगती. मित्रपरिवाराकडून लाभ. नवीन कल्पना सुचतील. दुपारनंतर चिडचिड वाढू शकते, संयम आवश्यक. आर्थिक वाढ संभवते.

मीन (दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची)

मान-सन्मानात वाढ होईल. मोठ्यांकडून आशीर्वाद मिळेल. वस्तूंची काळजी घ्या. दुपारनंतर भावनिक निर्णय टाळा. शुक्राच्या कृपेने काही सुखद अनुभव येतील.

कुंडलीवरून करिअर, लग्न, व्यवसाय व इतर सखोल मार्गदर्शनासाठी तसेच “राशीभाव” या कार्यक्रमाच्या बुकिंगसाठी संपर्क करा.

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक – 8087520521

व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अल्प किमतीत जाणून घ्या.

कुंडली परीक्षणासाठी आजच संपर्क करा.

संबंधित बातम्या