राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)
⏰ राहुकाळ - सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०
✨ "आज चांगला दिवस आहे."
???? नक्षत्र – आश्लेषा / (रात्री ८.०५ नंतर) मघा
???? आज जन्मलेल्या बाळाची राशी – कर्क / (रात्री ८.०५ नंतर) सिंह.
???? विशेष ग्रहयोग :-
रवी केंद्र प्लूटो
२५ एप्रिल रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
तुमच्यावर नेपच्यून आणि मंगळ या दोन ग्रहांचा प्रभाव आहे. नेपच्यून ग्रह गूढ तत्वांचा असल्याने उच्च कोटीचा अहंकार, अकल्पित घटना, पाण्यापासून मिळणारे लाभ, पक्ष्यांप्रमाणे स्वैर, परंपरागत रूढी यांचा तिरस्कार ही तुमची वैशिष्ट्ये आहेत. तुम्हाला दूरच्या प्रवासाची आवड असते. तुम्ही तर्कशुद्ध विचार करतात आणि हातात घेतलेले काम पूर्ण करतात. तुमचा सहसा दूरच्या प्रदेशात किंवा परदेशाचे संबंध येतो. चंद्र आणि नेपच्यून यांच्या प्रभावामुळे तुमचं मन अतिचंचल होते आणि तुम्हाला एखादा निर्णय घेणे अवघड जाते. तुमच्या स्वभावात विसंगती आढळून येते. तुमची स्मरण शक्ती चांगली असते. तुमचे बोलणे आकर्षक असते. तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीत वाटा मिळतो. तुमच्यात प्रचंड आत्मविश्वास असून अपंग लोकांना तुम्ही मदत करतात. अध्यात्मिक क्षेत्रात तुम्ही वरच्या पदावर जातात. तुम्ही स्वाभिमानी आणि निग्रही आहात. स्वातंत्र्याचे तुम्ही भोक्ते असतात त्यामुळे सहसा नोकरी करत नाहीत किंवा इतरांच्या हाताखाली काम करणे तुम्हाला आवडत नाही. एखाद्या गोष्टीचा सखोल अभ्यास करणे हे तुमचे वैशिष्ट्य आहे.
व्यवसाय:- आयात-निर्यात, दुग्ध व्यवसाय, मत्स्य व्यवसाय, साबण, केमिकल्स, इलेक्ट्रॉनिक, संशोधन.
शुभ दिवस:- रविवार, सोमवार, बुधवार.
शुभ रंग:- पिवळा.
शुभ रत्न:- पुष्कराज, पाचू, मोती.
*कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*
???? टीप: नावाप्रमाणेच राशी असतील असे नाही.
???? मेष (चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ)
आज ऊर्जा आणि उत्साह वाढेल. नवीन कामात यश मिळेल. आत्मविश्वासाच्या जोरावर प्रगती साधाल.
???? वृषभ (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)
आर्थिक बाबतीत सुधारणा होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. गुंतवणुकीत लाभ संभवतो.
???? मिथुन (का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा)
संवादातून नवीन संधी मिळतील. मित्रांचे सहकार्य लाभेल. प्रवासाचे योग संभवतात.
???? कर्क (हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो)
चंद्र राशीत असल्याने आत्मविश्वास वाढेल. निर्णय योग्य ठरतील. दिवस अनुकूल राहील.
???? सिंह (मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे)
रात्रीनंतर चंद्र राशीत येईल. प्रतिष्ठा आणि मान वाढेल. नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराल.
???? कन्या (टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो)
कामात स्थैर्य राहील. नियोजन यशस्वी ठरेल. आरोग्य सुधारेल.
⚖️ तुळ (रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते)
संबंधांमध्ये गोडवा वाढेल. सामाजिक क्षेत्रात यश मिळेल. मित्रांचे सहकार्य लाभेल.
???? वृश्चिक (तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु)
कामात प्रगती होईल. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. आर्थिक लाभ संभवतो.
???? धनु (ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे)
भाग्य साथ देईल. शिक्षण आणि प्रवासात यश मिळेल. नवीन संधी मिळतील.
???? मकर (भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी)
आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. संयमाने निर्णय घ्या. दिवस मध्यम राहील.
???? कुंभ (गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा)
भागीदारीत यश मिळेल. संबंध मजबूत होतील. नवीन योजना यशस्वी होतील.
???? मीन (दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची)
कामात व्यस्तता वाढेल. आरोग्याची काळजी घ्या. शिस्त राखणे आवश्यक आहे.
???? कुंडली, करिअर, विवाह, व्यवसाय मार्गदर्शनासाठी संपर्क करा:
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक – 8087520521