जगातील सर्वात तरुण महिला CA – नंदिनी अग्रवाल

जगातील सर्वात तरुण महिला CA – नंदिनी अग्रवाल
  • Positive News
  • सप्टेंबर 4 2025

Share on  

जगातील सर्वात तरुण महिला CA – नंदिनी अग्रवाल

"स्वप्नं किती मोठी आहेत यापेक्षा ती पूर्ण करण्याची जिद्द किती मोठी आहे हे महत्त्वाचं असतं."
हे वाक्य सत्यात उतरवलं आहे मध्यप्रदेशच्या मुरैना जिल्ह्यातील एका साध्या घरातील मुलीने – नंदिनी अग्रवाल हिने.

अवघ्या १९ वर्षे ८ महिने १८ दिवसांच्या वयात तिने CA (चार्टर्ड अकाउंटंट) फायनलची कठीण परीक्षा उत्तीर्ण करून जगातील सर्वात तरुण CA होण्याचा मान मिळवला. एवढंच नाही तर तिने मिळवला ऑल इंडिया रँक १ (AIR )

 अभ्यासाची वाटचाल

नंदिनी लहानपणापासून अभ्यासू होती. तिचा भाऊ साकेत अग्रवाल सुद्धा CA करण्याच्या मार्गावर होता. दोघांनी मिळून खांद्याला खांदा लावून अभ्यास केला. भावाने तिला मार्गदर्शन केले आणि दोघांनी मिळून दिवसरात्र कष्ट घेतले.

CA ही भारतातील सर्वात कठीण मानल्या जाणाऱ्या परीक्षांपैकी एक.

१२वी नंतर लगेचच नंदिनीने CA फाऊंडेशनला प्रवेश घेतला.

तिच्या सातत्यपूर्ण मेहनतीमुळे ती प्रत्येक पातळीवर उत्तीर्ण होत गेली.

शेवटी २०२१ मध्ये ती CA फायनलला बसली आणि ८०० पैकी ६१४ गुण (७६.७५%) मिळवत यशाची शिखरं गाठली.

अडचणी आणि जिद्द:

नंदिनी एवढ्या कमी वयाची असल्यामुळे प्रशिक्षणासाठी अर्ज करताना तिला वारंवार नकार मिळत होते. पण ती खचली नाही. तिने वेळ वाया न घालवता तयारी सुरुच ठेवली.
तिच्या मेहनतीमुळे आणि चिकाटीमुळे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स यांनी तिचं नाव नोंदवलं.

प्रेरणादायी संदेश

नंदिनी म्हणते –
 “कठोर मेहनत, वेळेचं योग्य नियोजन, स्वतःवर विश्वास आणि सकारात्मक विचार यामुळे काहीही अशक्य नाही. अडचणी आल्या तरी हार मानू नका, प्रत्येक पाऊल तुम्हाला यशाजवळ घेऊन जातं.” 

शिकण्यासारखं काय?

वय हे फक्त एक आकडा आहे

सातत्यपूर्ण प्रयत्न आणि शिस्त यामुळे मोठमोठी ध्येयं साध्य होतात

योग्य मार्गदर्शन आणि कुटुंबाचा आधार असेल तर अशक्य काहीच नाही

 नंदिनी अग्रवालची कहाणी प्रत्येक मुलीला, प्रत्येक विद्यार्थ्याला आणि प्रत्येक कुटुंबाला प्रेरणा देणारी आहे.
ती आज जगभरातील तरुणांसाठी एक संदेश आहे –
“स्वप्नं बघा आणि ती पूर्ण करण्याची हिंमत ठेवा. यश नक्कीच मिळेल.”
 

संबंधित बातम्या