नागपूरमध्ये होणार जगातील पहिले आणि एकमेव न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठ 

नागपूरमध्ये होणार जगातील पहिले आणि एकमेव न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठ 
  • Positive News
  • मे 27 2025

Share on  

नागपूरमध्ये होणार जगातील पहिले आणि एकमेव न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठ 
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते आणि केंद्रीय मंत्री नितिन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज नागपूर येथे 'राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठा'चे भूमिपूजन आणि पायाभरणी करण्यात आली.

नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटीसाठी राज्य शासनाने नागपूरमधील कामठी तालुक्यातील चिंचोली या गावी 50 एकर जागा उपलब्ध करून दिली आहे. राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठ (एनएफएसयू) हे जगातील पहिले आणि एकमेव न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठ आहे. महाराष्ट्रामध्ये एनएफएसयूच्या नवीन कॅम्पसमुळे 'कुशल फॉरेन्सिक तज्ज्ञांचा' समूह तयार होणार आहे. यामार्फत कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांना 'फॉरेन्सिक सायन्स'च्या वैज्ञानिक वापराद्वारे गुन्हे रोखण्यास, कमी करण्यास आणि शोधण्यास मदत होणार आहे.

नागपूर कॅम्पसमुळे कायदा आणि सुव्यवस्थेशी संबंधित विविध समस्या सोडवण्यास तसेच न्यायदान प्रणाली वेगवान होण्यास मदत होईल. राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठ 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून नागपूर कॅम्पसमध्ये न्यायवैद्यक विज्ञान आणि सायबर सुरक्षेशी संबंधित 5 अभ्यासक्रम सुरू करणार आहे.

यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ. आशिष देशमुख, एनएफएसयूचे कुलगुरू डॉ. जे. एम. व्यास तसेच संबंधित अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

संबंधित बातम्या