स्पिरिच्युअल इंटेलिजंट घडवेल यशाचा मार्गःपूज्य डॉ. ज्ञानवत्सल स्वामीजी
'प्राण'तर्फे 'व्यवसाय वृद्धीसाठी अध्यात्मिक मार्गदर्शन'
नाशिक | प्रतिनिधी
विद्यार्थीदशेपासून इतर कुठल्याही स्तरावर आपला आयक्यू अर्थात इंटेलीजंट कोशनटं महत्वाचा मानला जायचा. परंतु आयक्यू सोबत इक्यु अर्थात इमोशनल कोशंनट यांचा योग्य समन्वय असल्याचा अश्या व्यक्ती अधिक चांगली प्रगती करू शकतात, असे निदर्शनास आले. नंतरच्या काळात भरपूर संशोधनानंतर 'स्पिरिच्युअल इंटेलिजंट'चे महत्व अधोरेखित झाले आहे. ही कौशल्ये ज्यांच्यात असतील अशा व्यक्ती वैयक्तिक आयुष्यापासून तर देशाचे नेतृत्व करण्यात सक्षम होतात. ही कौशल्ये यशाचा मार्ग घडवू शकेल, असे प्रतिपादन जगप्रसिद्ध प्रेरक वक्ते आणि 'बीएपीएस' स्वामीनारायण संस्थेचे कॉर्पोरेट स्पीकर पूज्य डॉ.ज्ञानवत्सल स्वामीजी यांनी गुरुवारी (३० एप्रिल) केले.
रिअल इस्टेट क्षेत्रातील व्यावसायिक आणि उद्योजकांच्या प्रगतीसाठी अध्यात्मिक विचारांची जोड देण्याच्या उद्देशाने 'प्रोफेशनल रिअलटर्स असोसिएशन ऑफ नाशिक' (प्राण) च्या वतीने ३४ व्या 'नॉलेज फोरम'चे आयोजन करण्यात आले आहे. कॉलेजरोडवरील गुरुदक्षिणा सभागृह येथे आयोजित केलेल्या या सत्राप्रसंगी ते बोलत होते. 'व्यवसाय वृद्धीसाठी आध्यात्मिक मार्गदर्शन' असा त्यांचा व्याख्यानाचा विषय होता. याप्रसंगी महाव्रत स्वामीजी, प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक दीपक चंदे, 'नार' वेस्ट झोनचे प्रमुख उदयन माने, 'प्राण'चे अध्यक्ष राज तलरेजा, सचिव नितीन कोतकर, खजिनदार नितीन जागंडा, नॉलेज फोरमचे प्रमुख प्रशांत नहार, उपाध्यक्ष प्रदीप रणधीर उपस्थित होते.
ज्ञानवत्सल स्वामीजी म्हणाले, स्पिरिच्युअल इंटेलिजंट असलेल्या व्यक्तींमध्ये लवचिकता, सामंजस्य भाव, नैतिकता, स्वयं जागरूकता अशी आठ गुण प्रगतीसाठी उपयुक्त ठरतात. प्रथम आपण माणूस आहोत आणि नंतर व्यावसायिक आहोत. प्रत्येकाला आपल्या आयुष्यात विकासाची गरज असते. म्हणून वैयक्तीक आयुष्याचा विकास अशा नॉलेज फोरमच्या माध्यमातून होऊ शकतो, असे सांगत त्यांनी उपक्रमाचे कौतुक केले.
'प्राण'चे अध्यक्ष राज तलरेजा म्हणाले, नाशिक एक महत्त्वपूर्ण वळणावर उभे आहे. कुंभमेळा सारख्या धार्मिक सोहळ्यानिमित्त विकासाला मोठी संधी उपलब्ध आहे. यातून सर्व क्षेत्रांना पाठबळ देण्याचे काम संघटना करत आहे. सामान्यांच्या स्वप्नांना साकार करण्याचे काम संघटना करत आहे. संपूर्ण कार्यकारणी सदस्यांनी परिश्रम घेतल्याने हा कार्यक्रम यशस्वी होत असल्याचे त्यांनी सांगितले.
'नार' वेस्ट झोनचे प्रमुख उदयन माने म्हणाले, शिस्त, नैतिकता या गोष्टी कटाक्षाने पाळत सदस्य व्यवसाय करत आहेत. 'नार' इंडियाच्या माध्यमातून साडे पाच हजार सदस्य कार्यरत आहेत. संघटनेद्वारे शहर एकमेकांशी जोडले जात आहेत. पन्नास हजार सदस्यांचा समूह बनविण्याचा प्रयत्न करून, सर्वाना जोडण्यासाठी अँप देखील विकसित केले आहे.
नॅशनल असोसिएशन ऑफ रिअलटर्स-इंडियाशी संलग्न 'प्राण' संस्थेच्या या उपक्रमाला शहरातील अनेक नामांकित संस्थांनी पाठिंबा दिला. यामध्ये 'क्रेडाई', नरेडको, 'नाशिक मेट्रो', 'जीतो', भारतीय जैन संघटना, 'नाशिक सिटीझन फोरम', 'महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स', 'आयसीएआय', 'रोटरी क्लब ऑफ नाशिक', लायन्स क्लब ऑफ नाशिक- स्मार्ट सिटीझन आणि 'नाशिक सायकलिस्ट' यांसह अनेक सामाजिक व व्यावसायिक संघटनांचा समावेश होता. 'दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स' या कार्यक्रमाचे प्रायोजक होते.
या उपक्रमाप्रसंगी अध्यक्ष राज तलरेजा, सचिव राजेंद्र कोतकर, माजी अध्यक्ष विक्रांत आव्हाड, नितीन कोतकर, सहसचिव गिरीष विजन, खजिनदार नितीन जांगडा, सहखजिनदार अमित वाघ, सल्लागार डी. जे. धामणे, कैलास कदम, श्रीरंग भदाणे, रविंद्र सूर्यवंशी, प्रशांत नहार, जगदीश बंग, पवन राठी, यश शाह, संजय दुसे, योगेश नेरकर, श्रीकांत पाटेकर, नीलेश येवले, क्षितीज दंडगव्हाळ, मनीष शाह, प्रियांका तलरेजा, भावेश सचदेव, बादल अग्रवाल आदीनी परिश्रम घेतले .
यांचा झाला कार्यक्रमात सत्कार
या कार्यक्रमात क्रेडाईचे अध्यक्ष - गौरव ठक्कर, सचिव तुषार साखलेचा, नरेडकोचे अध्यक्ष शंतनु देशपांडे, सचिव भाविक ठक्कर, बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष मनोज खांडेकर, सचिव अविनाश आव्हाड, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स ॲग्रीकल्चर इंडस्ट्रीचे उपाध्यक्ष - संजय सोनवणे, निमाचे अध्यक्ष आशिष नहार, सचिव राजेंद्र अहिरे, आयमा अध्यक्ष राजेंद्र पानसरे, सचिव संजय महाजन, बीएनआय (BNI) प्रादेशिक संचालक विक्रम माथूर, लघु उद्योग भारती अध्यक्ष निखिल तापडिया, लायन्स क्लब ऑफ नाशिक अध्यक्ष योगेश नेरकर, सचिव सचिन वाघमारे, रोटरी क्लब ऑफ नाशिकचे अध्यक्ष गौरव सामनेरकर, सचिव मकरंद चिंधडे, हेमराज राजपूत, उद्योग वर्धिनी संचालक सुनील चांडक, श्रीराम चांडक, आयआयआयडीचे अध्यक्ष हकीम सिन्नरवाला, नाशिक बार असोसिएशन अध्यक्ष एड. नितीन ठाकरे, उपाध्यक्ष वैभव शेटे, ए अँड ईए अध्यक्ष रोहन जाधव, नाशिक सिटीझन फोरम उपाध्यक्ष आर्किटेक्ट सचिन गुळवे, एचडीएफसी बँकेचे प्रमुख - पराग रोकडे (कैलास काळुंगे), सीए अभिजीत मोदी, सचिव विशाल वाणी, एससीजीटी प्रादेशिक प्रमुख डॉ. प्रवीण केगे, योगेश सोनजे, एनबीए अध्यक्ष उमेश शिंदे, सचिव सुदर्शन गिते, तान अध्यक्ष मनोज वासवानी, मराठा उद्योजक फोरम अध्यक्ष संदीप बोरसे, सचिव माधव मुधळे, आयईएआय अध्यक्ष मनीष कोठारी, नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन अध्यक्ष अमित घुगे, संस्थापक अध्यक्ष हरीश बैजल, दविंदरसिंग बेला, बीजेएस अध्यक्ष नंदकिशोर साखला, जितो अध्यक्ष - दिनेश, सचिव धीरज पिचा, एमबीव्हीए अध्यक्ष संजय मोरे, नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशन अध्यक्ष - सैनी सर, लाड शाखीय वाणी समाज असोसिएशन अध्यक्ष गिरीश मालपुरे, अमित पटेल,समीर देसाई यांचा सत्कार करण्यात आला.