NIPM नाशिक चॅप्टरतर्फे "HR साठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI)" या विषयावर चर्चासत्र 

NIPM नाशिक चॅप्टरतर्फे
  • Positive News
  • मे 27 2025

Share on  

NIPM नाशिक चॅप्टरतर्फे "HR साठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI)" या विषयावर चर्चासत्र 

 

नाशिक मध्ये लवकरच वेस्टर्न रिजन कॉफरन्स चे आयोजन - निपम राष्ट्रीय अध्यक्ष डॉ एम एच राजा यांची घोषणा.

 

नाशिक: नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ परसोनेल मॅनेजमेंटच्या(NIPM)  नाशिक चॅप्टरच्या वतीने  हॉटेल गेटवे, नाशिक येथे "HR साठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI)" या विषयावर  विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले. 

 

यावेळी निपम नाशिक चाप्टर तर्फे वेस्टर्न रिजन कॉन्फरन्स नाशकात घेण्यात येणार असून त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन निपम चे राष्ट्रीय अध्यक्ष  राजा यांनी केले. चर्चासत्राच्या अध्यक्षपदावरून बोलत होते. नाशिक नाशिक चाप्टर तर्फे राबवण्यात येणाऱ्या विविध मनुष्यबळ व्यवस्थापकीय अधिकाऱ्यांसाठी राबविण्यात आलेल्या विकासात्मक कार्यक्रमाचे भरभरून कौतुक केले                               

 

यावेळी व्यासपीठावर निपम चे राष्ट्रीय अध्यक्ष  डॉ.एम एच राजा, नाशिक चाप्टर चे अध्यक्ष राजाराम कासार, कार्यक्रमाचे वक्ते एस भानूकुमार , प्रमुख पाहुणे  युवाशक्ती फाउंडेशनचे संचालक विक्रमादित्य पवार, सतीश पवार , निपम नाशिक शाखेचे माजी अध्यक्ष व मार्गदर्शक  डॉ.उदय खरोटे, निपम नाशिक शाखेचे सचिव प्रकाश गुंजाळ सहसचिव राजेंद्र आचारी, उपाध्यक्ष विनायक पाटील, खजिनदार सुष्मित दळवी, ब्रिजेश जाधव,  उपस्थित होते

यावेळी श्री. एस. भानुकुमार यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) या संकल्पनेचे HR क्षेत्रातील उपयोगाबद्दल सविस्तर मार्गदर्शन व विविध चित्रफितींद्वारे सादरीकरण करताना सांगितले की केले. त्यांनी सांगितले की, आजच्या डिजिटल युगात AI ही HR क्षेत्रासाठी एक क्रांतिकारी संधी आहे. याच्या साहाय्याने मानवी संसाधन व्यवस्थापन अधिक प्रभावी, वेगवान आणि अचूक होऊ शकते. यावेळी बोलताना म्हणाले की आर्टिफिशियल इंटेलिजन्स चां  विविध क्षेत्रातील वाढता प्रभाव बघता मनुष्यबळ क्षेत्रातील विविध कार्यप्रणालींच्या बळकटीसाठी उपयोग होणार असून त्याचा कुठलाही दुष्परिणाम होणार नसल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.

 

त्यांनी खालील महत्त्वाच्या बाबी स्पष्ट केल्या:

 

1. भरती प्रक्रिया (Recruitment Process):

AI च्या साहाय्याने योग्य उमेदवारांची छाननी करणे, त्यांचे रिझ्युमे विश्लेषित करणे, आणि पूर्व-मुलाखतींचे ऑटोमेशन शक्य होते. त्यामुळे HR ला गुणवत्तापूर्ण उमेदवार निवडण्यास मदत होते.

 

2. कर्मचाऱ्यांचा अनुभव (Employee Experience):

Chatbots व AI-बेस्ड संवाद प्रणालीमुळे कर्मचार्‍यांचे प्रश्न तत्काळ सुटतात. यामुळे कर्मचारी समाधान (Employee Satisfaction) वाढते.

 

3. प्रशिक्षण व विकास (Training & Development):

AI आधारित Learning Management Systems (LMS) हे प्रत्येक कर्मचाऱ्याच्या गरजेनुसार वैयक्तिक शिक्षणक्रम तयार करतात, ज्यामुळे कौशल्यवाढ अधिक प्रभावी ठरते.

 

4. डेटा विश्लेषण व निर्णय प्रक्रिया (Analytics & Decision Making):

AI प्रणाली मोठ्या प्रमाणावर HR डेटा विश्लेषित करू शकते. यातून ट्रेंड्स, कर्मचारी टिकाव, कार्यक्षमता मापन यावर आधारित धोरणात्मक निर्णय घेता येतात.

 

5. कामगिरी मूल्यमापन (Performance Evaluation):

बायस-मुक्त AI प्रणालीच्या साहाय्याने कर्मचाऱ्यांचे निष्पक्ष मूल्यमापन करता येते. यामुळे न्याय्य प्रोमोशन्स आणि सुधारणा शक्य होतात.

 

6. कायदेशीर अनुपालन (Compliance):

विविध नियमांचे पालन (Compliances) ट्रॅक करण्यासाठी AI अत्यंत उपयुक्त ठरते. याद्वारे वेळेत अचूक माहिती उपलब्ध होते.

 

शेवटी, श्री. भानुकुमार यांनी हेही अधोरेखित केले की, AI ही HR ची जागा घेणार नाही, तर HR ला अधिक प्रभावशाली, डेटा-आधारित आणि रणनीतीशील बनवेल. मानवी संवेदनशीलता आणि AI यांचे संतुलन राखणे ही भविष्यातील यशाची गुरुकिल्ली ठरेल.

 

या विशेष सत्राचे उद्घाटन NIPM चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. एम. एच. राजा यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. प्रमुख पाहुणे म्हणून सन्मानित करताना त्यांनी नाशिक चॅप्टरच्या कार्याचे कौतुक केले व भविष्यात नाशिकमध्ये राष्ट्रीय किंवा प्रादेशिक परिषदेचे आयोजन करावे असे सूचित केले.
 

संबंधित बातम्या