निस्वार्थ प्रेम हीच खरी व्हॅलेंटाईनची ओळख : (Healer Anjali Jadhav,Thane)

 निस्वार्थ प्रेम हीच खरी व्हॅलेंटाईनची ओळख  :  (Healer Anjali Jadhav,Thane)
  • Positive News
  • फेब्रुवारी 14 2026

Share on  

 निस्वार्थ प्रेम हीच खरी व्हॅलेंटाईनची ओळख
(Healer Anjali Jadhav,Thane)

आज “व्हॅलेंटाईन डे” म्हटलं की डोळ्यांसमोर येतात
लाल गुलाब ,
“I Love You” चे मेसेज ,
कपल फोटो, गिफ्ट्स आणि सोशल मीडियावरचा प्रेमाचा मारा.
पण खरंच…
व्हॅलेंटाईन म्हणजे फक्त बॉयफ्रेंड–गर्लफ्रेंड एवढंच ahe का ?

#व्हॅलेंटाईन डे ची सुरुवात कशी झाली?# 
 
इतिहास सांगतो की “व्हॅलेंटाईन” नावाचा एक संत होता.
त्याने प्रेम, करुणा आणि माणुसकी यांचा संदेश दिला.
त्याचं प्रेम हे स्वार्थी नव्हतं,
ते होतं — त्यागाचं, निस्वार्थी आणि धैर्याचं.
म्हणजेच सुरुवातीचा व्हॅलेंटाईन डे
हा फक्त रोमँटिक प्रेमासाठी नव्हता,
तर माणसामाणसांमधील जिव्हाळा, आपुलकी आणि विश्वास यासाठी होता.
आज व्हॅलेंटाईन डे चे स्वरूप कसे बदलले?
आजच्या काळात
व्हॅलेंटाईन डे = लव बर्ड्स, गिफ्ट्स, रिलेशनशिप स्टेटस
असं चित्र तयार झालं आहे.
ज्यांच्याकडे पार्टनर नाही,
त्यांना कधी कधी हा दिवस एकटेपणाची जाणीव करून देतो.
पण प्रेमाची व्याख्या इतकी लहान नाही.

व्हॅलेंटाईन चे प्रेम म्हणजे फक्त प्रेमसंबंध नाही....
 व्हॅलेंटाईन म्हणजे 
आईचं प्रेम —
जे कोणतीही अपेक्षा न ठेवता आपल्यासाठी आयुष्य घालवतं.
वडिलांचं प्रेम —
जे शब्दात कमी, पण जबाबदारीत मोठं असतं.
बहिण–भावाचं प्रेम —
भांडणामागेही काळजी असते.
मैत्रीचं प्रेम —
जे कठीण काळात हात सोडत नाही.
स्वतःवरचं प्रेम —
जे आपल्याला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या सशक्त ठेवतं.
हे सगळं प्रेम नाही का?

#प्रेम म्हणजे नक्की काय?#
प्रेम म्हणजे....
काळजी
 आदर
 स्वीकार
 साथ
 सुरक्षिततेची भावना
प्रेम म्हणजे फक्त “I Love You” म्हणणं नाही,
तर
“मी तुझ्यासोबत आहे”
ही भावना आहे.

तुम्ही व्हॅलेंटाईन डे कसा साजरा कराल?

या व्हॅलेंटाईन डे ला
फक्त गुलाब देण्याऐवजी 
*  आईला मिठी मारा
*  वडिलांना धन्यवाद म्हणा
* मित्रमैत्रिणींची आठवण काढा
*  कोणाला तरी मनापासून फोन करा
* आणि सगळ्यात महत्त्वाचं — स्वतःशी प्रेमाने वागा


व्हॅलेंटाईन डे म्हणजे एक दिवस नाही,
ती एक भावना आहे.
प्रेम जर खरं असेल,
तर ते कोणत्याही एका नात्यापुरतं मर्यादित नसतं.
प्रेम पसरवा…
कारण निस्वार्थ प्रेम हीच खरी व्हॅलेंटाईनची ओळख आहे. ❤️

संबंधित बातम्या