हमिंगचे वैज्ञानिक परिणाम .... भ्रामरी, ओमकार आणि बीच मंत्रांचे सामर्थ्य : (Heal With Anjali)

हमिंगचे वैज्ञानिक परिणाम .... भ्रामरी, ओमकार आणि बीच मंत्रांचे सामर्थ्य : (Heal With Anjali)
  • Positive News
  • डिसेंबर 7 2025

Share on  

हमिंगचे वैज्ञानिक परिणाम .... भ्रामरी, ओमकार आणि बीच मंत्रांचे सामर्थ्य : (Heal With Anjali)

 हमिंगच्या ध्वनी-कंपनांनी नायट्रिक ऑक्साइड वाढते आणि शरीराचा आतला नैसर्गिक उपचार सुरू होतो

 प्राचीन काळापासून ओमकार, भ्रामरी आणि बीज मंत्रांमधून निर्माण होणारे हमिंग मन शांत करण्यासाठी आणि शरीर शुद्ध करण्यासाठी प्रभावी मानले गेले आहे. आज आधुनिक विज्ञान सांगते की हे ध्वनी-कंपन नायट्रिक ऑक्साइड (NO) वाढवतात — जे रोगप्रतिकारशक्ती, रक्ताभिसरण आणि relaxation साठी अत्यंत महत्त्वाचे नैसर्गिक रेणू आहे.
हमिंग कसे कार्य करते? (वैज्ञानिक दृष्टिकोन)

शोधांनुसार हमिंग केल्यावर नासिकागुहेत तयार होणाऱ्या नायट्रिक ऑक्साइडचे प्रमाण १५–२० पट वाढते.

हे का होते?

आपल्या साइनसेसमध्ये नायट्रिक ऑक्साइड नैसर्गिकरित्या तयार होते.

हमिंग केल्यावर कंपन आणि resonance तयार होते.

या कंपनामुळे अधिक नायट्रिक ऑक्साइड श्वासात मिसळते.

हे NO फुफ्फुसांपर्यंत पोहोचून रक्तप्रवाहात जाते आणि healing सुरू करते.

फक्त १०–२० सेकंद हमिंग देखील मोजण्याजोगे फायदे देते.

 नायट्रिक ऑक्साइड का महत्त्वाचे आहे?
नायट्रिक ऑक्साइड शरीरात खालील गोष्टी करते:

 रोगप्रतिकारशक्ती वाढवते

 जंतू, विषाणू नष्ट करण्यात मदत करते, सूज कमी करते

 श्वासोच्छ्वास सुधारते,
वायुमार्ग relax करते आणि oxygen exchange सुधारते

 रक्ताभिसरण वाढवते,
रक्तवाहिन्या relax करून हृदयाचे आरोग्य सुधारते, BP कमी करते

 सेल रिपेअरला मदत
जास्त oxygen flow = उत्तम healing

 ताण कमी करते
हमिंगची vibration व्हेगस नर्व्ह सक्रिय करून मन शांत करते

 हमिंग सक्रिय करण्याचे सोपे मार्ग?‍ 1) भ्रामरी प्राणायाम — योगिक हमिंग

भ्रामरीमध्ये मधमाशी सारखा सौम्य “हम्म्म्म” आवाज तयार होतो.

फायदे:

* नायट्रिक ऑक्साइड वाढते

* ताण-तणावाचे हार्मोन्स कमी होतात

* anxiety, hypertension, insomnia मध्ये उपयोगी

* सायनस drainage सुधारते

* खोल relaxation मिळते

 फक्त काही फेऱ्या (आदर्शतः २१) मोठा फरक निर्माण करतात.

 2) ओमकार जप (AUM)

ओमचा “मmmmm” भाग विशेषतः शक्तिशाली आहे.

फायदे:

* नायट्रिक ऑक्साइडचे प्रमाण वाढवते

* ब्रेन वेव्ह harmonize करते

* भावना शांत करते

* एकाग्रता आणि स्थैर्य वाढवते


 ओमकार २१ वेळा जप केल्यास मन आणि शरीराची शुद्धी होते.

 3) बीज मंत्र जप (२१ वेळा) — कंपनातून उपचार

बीज मंत्रांचे ध्वनी विशिष्ट frequency तयार करतात ज्यामुळे भावना, ऊर्जा आणि मनःस्थिती संतुलित होते.

बीजमंत्र + मराठी उच्चार:

LAM (लं) – रूट चक्र

VAM (वं) – स्वाधिष्ठान चक्र

RAM (रं) – मणिपूर चक्र

YAM (यं) – अनाहत चक्र

HAM (हं) – विशुद्धि चक्र

OM / AUM (ॐ) – आज्ञा चक्र

Silent OM (प्रणव प्राणायाम – ओमचा अनुभव) – सहस्रार चक्र

वैज्ञानिक दृष्टिकोन:

 बीच मंत्राचा पुनरुच्चार:

 वॅगस नर्व्ह सक्रिय करतो

ताण कमी करतो

हमिंगसारख्या कंपनामुळे नायट्रिक ऑक्साइड वाढवतो

 अशा प्रकारे बीच मंत्र जप योग आणि विज्ञान या दोन्ही सिद्धांतांना जोडतो.

 हे सर्व कसे कार्य करते?

हमिंग, ओमकार, भ्रामरी, बीज मंत्र — सर्व तंत्रे एका समान सूत्रावर आधारित आहेत:

ध्वनी + श्वास = कंपन → नायट्रिक ऑक्साइड वाढ → चांगली immunity, शांत मन, आणि जलद healing

 हमिंग….. शरीर आणि मन यांना नैसर्गिकरीत्या एकसंध करणारा सुंदर मार्ग.

 Important note by Smile Healer Anjali:
ummmm करताना जरूर Smile करा — यामुळे vibrations आणखी effective बनते

Disclaimer:

ही माहिती केवळ सामान्य जनजागृती आणि well-being साठी आहे. याचा वैद्यकीय निदान किंवा उपचार असा अर्थ घेऊ नये. कोणत्याही आरोग्यविषयक समस्येसाठी कृपया पात्र डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. श्वसन किंवा मंत्र जपाच्या कोणत्याही पद्धती सुरू करण्यापूर्वी तज्ञांची मार्गदर्शन घ्यावे.

संबंधित बातम्या