नाशिक : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त संस्कृती सखी मंच, नाशिक तर्फे आयोजित “Saree Walkathon – 2nd Edition” हा उपक्रम मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. महिलांच्या आरोग्यजागृतीसह भारतीय संस्कृतीचे प्रतीक असलेल्या साडीचा गौरव करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
हा Walkathon RTO सिग्नल येथून सुरू होऊन मेरी – जिओ पेट्रोल पंप – देवधर स्कूल – किशोर सूर्यवंशी मार्ग मार्गे पुन्हा RTO सिग्नल येथे असा सुमारे २ किलोमीटर मार्ग निश्चित करून पार पडला.
या कार्यक्रमासाठी नगरसेविका सौ. दीपली गीते, सौ. रंजना भन्सी व सौ. रुपाली नानावरे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात स्वस्ती मंत्राने झाली. स्वस्ती मंत्राचे पौरोहित्य करण्याऱ्या महिलांनी केले. त्यानंतर अनंत विजय पथक या समूहाने शंखनाद करून Walkathon ची उत्साहपूर्ण सुरुवात केली. तसेच ढोल पथकाने Walkathon चे नेतृत्व करत वातावरणात उत्साहाची लहर निर्माण केली.
या Walkathon मध्ये सुमारे ४00 महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाची छाप पाडणाऱ्या महिलांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यामध्ये
डॉ. गायत्री सांगळे, डॉ. हीना अग्रवाल, डॉ. प्रियांका कुर्डुकर, उमा किर्वे, योगिता निकम, कविता महाले, अॅड. एकता कदम, विद्या थोरात, काव्या विरवाणी, प्राजक्ता देशपांडे, डायटिशियन क्षितिजा गायकवाड, मानसी टेपाले आणि मधुरा टेपाले यांचा समावेश होता.
Walkathon मध्ये सहभागी महिलांसाठी आकर्षक बक्षिसे देण्यात आली. ११ पैठणी, ११ ठूशी आणि ११ नथ अशी वैयक्तिक गटातील बक्षिसे देण्यात आली. तसेच ७ उत्कृष्ट गटांना विशेष पारितोषिके प्रदान करण्यात आली.
या स्पर्धेचे परीक्षक म्हणून नंदिनी कुपस्त, सोनाली देशमुख, साई पावशे, कामिनी कदम आणि शिवानी कुमावत यांनी कामकाज पाहिले.
कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन सौ. नेहा जोशी यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी संस्कृती सखी मंचच्या अध्यक्षा सौ. पल्लवी कुलकर्णी, उपाध्यक्षा सुप्रिया कुलकर्णी, सल्लागार प्राजक्ता कुलकर्णी तसेच समिती सदस्य पूजा कासार, स्वप्ना काठे, श्रद्धा कुलकर्णी, नेहा पुराणिक आणि काव्या विरवाणी यांनी विशेष परिश्रम घेतले.
या उपक्रमामुळे महिलांमध्ये आरोग्य, आत्मविश्वास आणि एकात्मतेचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले.