कॅनडा इंडिया फाऊंडेशनकडून सद्गुरूंना "ग्लोबल इंडियन ऑफ द इयर" पुरस्कार
सद्गुरूंना हा पुरस्कार मानवी चेतना उंचावण्यासाठी आणि कॉन्शस प्लॅनेट मोहिमेद्वारे केल्या गेलेल्या पर्यावरणविषयक प्रयत्नांसाठी दिला गेला आहे
सद्गुरूंना मिळालेले ५०,००० कॅनेडियन डॉलर्सचे बक्षीस त्यांनी कावेरी नदीच्या पुनरुज्जीवनासाठी आणि ८४ दशलक्ष लोकांचे जीवन बदलण्यासाठी कार्यरत असणाऱ्या कावेरी कॉलिंग उपक्रमाला समर्पित केली.
२६ मे २०२५: भारतीय योगी, अध्यात्मिक गुरू आणि ईशा फाऊंडेशनचे संस्थापक, सद्गुरू यांना कॅनडा इंडिया फाऊंडेशन (सीआयएफ) तर्फे ‘ग्लोबल इंडियन अवॉर्ड २०२५’ प्रदान करण्यात आला आहे.
हा पुरस्कार त्यांना मानवी चेतना उंचावण्यासाठी आणि कॉन्शस प्लॅनेट मोहिमेद्वारे पर्यावरणविषयक केल्या गेलेल्या प्रयत्नांसाठी दिला गेला आहे.
जागतिक पातळीवर महत्वाचा प्रभाव टाकणाऱ्या भारतीय वंशाच्या व्यक्तींना हा प्रतिष्ठित पुरस्कार दिला जातो.