गुरुवार, १३मार्च २०२५. फाल्गुन शुक्ल चतुर्दशी/पौर्णिमा. वसंत ऋतू. शके १९४६, संवत २०८१. क्रोधी नाम संवत्सर. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)
राहू काळ - दुपारी १.३० ते दुपारी ३.००
"आज वर्ज्य दिवस आहे." हुताशनी पौर्णिमा (होळी)
चंद्र नक्षत्र - पूर्वा (फाल्गुना). आज जन्मलेल्या बाळाची राशी - सिंह.
मेष:- चंद्राचा मंगळाशी लाभ योग तर गुरुशी केंद्र योग आहे. प्रापंचिक सुख मिळेल. भावंडांशी सुसंवाद साधाल. दबदबा वाढेल. नोकरीच्या ठिकाणी काळजी घ्या.
वृषभ:- सामाजिक कार्यात भाग घ्याल. प्रसंगी कठोर बोलावे लागेल. शब्दास मान द्यावा लागेल. विनाकारण मन अस्वस्थ राहील.
मिथुन:- तृतीय स्थानी चंद्र आहे. भावंड मदत करतील. पराक्रम गाजवाल. दबदबा वाढेल. दानधर्म करावा लागेल.
कर्क:- कौटुंबिक सौख्य लाभेल. मन आनंदी राहील. खरेदी होईल. मित्र मंडळी भेटतील.
सिंह:- अनुकूल योगातील चंद्र तुमच्याच राशीत आहे. आत्मविश्वास भरपूर वाढलेला आहे. यश मिळेल. अनुकूल मंगळ धनप्राप्ती करून देईन. लक्ष्मी प्रसन्न होईल.
कन्या:- आज अनुकूल दिवस नाहीये. दिरंगाई अनुभवाल. विनाकारण त्रास होईल. खर्च वाढतील. प्रवासाचे नियोजन चुकेल.
तुळ:- लाभ स्थानी चंद्र आहे. सुखद अनुभव येतील. उत्साह वाढेल. चांगली बातमी समजेल. मात्र चुकीचे कर्म टाळा.
वृश्चिक:- दशम चंद्र कामाच्या ठिकाणी उत्साह वाढवेन. मौल्यवान खरेदी होईल. ऐनवेळी नवीन जबाबदारी येऊन पडेल.
धनु:- आज फारशी अनुकूलता नाही. काही विशेष घटना घडतील. कोर्ट कामात प्रगती होईल. एखादी अप्रिय बातमी येऊ शकते.
मकर:- संमिश्र कालावधी आहे. धनलाभ होईल. मात्र इतर बाबतीत फारशी अनुकूलता नाही. विनाकारण वादात पडू नका. कुटुंबास वेळ द्या.
कुंभ:- सप्तम चंद्र आहे. घरगुती कामात वेळ व्यतीत होईल. येणी वसूल होतील. गुप्त शत्रूचा त्रास मात्र वाढेल. संतती साठी खर्च करावा लागेल.
मीन:- व्यवसायात लाभ होतील. आर्थिक स्थिती सुधारेल. तुमचे स्पर्धक मात्र त्रास देऊ शकतात. राजकीय भाष्य टाळा.
- ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521