ऑगस्टच्या पहिल्याच दिवशी सोनं स्वस्त; 24 कॅरेट सोन्याच्या दरात 380 रुपयांची घसरण, चांदी स्थिर!

ऑगस्टच्या पहिल्याच दिवशी सोनं स्वस्त; 24 कॅरेट सोन्याच्या दरात 380 रुपयांची घसरण, चांदी स्थिर!
  • Positive News
  • ऑगस्ट 2 2026

Share on  

ऑगस्टच्या पहिल्याच दिवशी सोनं स्वस्त; 24 कॅरेट सोन्याच्या दरात 380 रुपयांची घसरण, चांदी स्थिर!

मुंबई, पुणे, दिल्ली, नागपूरसह प्रमुख शहरांतील सोन्याचे नवे दर जाहीर; चांदीचा भाव कायम

मुंबई : ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच दिवशी सराफा बाजारातून सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. १ ऑगस्ट रोजी २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅम (१ तोळा) दरात ३८० रुपयांची घसरण झाली असून, गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेली घसरण आजही कायम राहिली. मात्र, चांदीच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

सध्याच्या दरानुसार २४ कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅम भाव १४,४३७ रुपये, २२ कॅरेटचा प्रति ग्रॅम १३,२२५ रुपये, तर १८ कॅरेटचा प्रति ग्रॅम १०,८३१ रुपये इतका आहे. भविष्यात सोन्याच्या किंमती आणखी कमी होतील का, याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे. Goodreturns नुसार प्रमुख शहरांतील ताजे दर पुढीलप्रमाणे आहेत.

मुंबईतील आजचे सोन्याचे दर
24 कॅरेट

१ ग्रॅम – ₹14,422
८ ग्रॅम – ₹1,15,376
१० ग्रॅम – ₹1,44,220
22 कॅरेट

१ ग्रॅम – ₹13,220
८ ग्रॅम – ₹1,05,760
१० ग्रॅम – ₹1,32,200
18 कॅरेट

१ ग्रॅम – ₹10,816
८ ग्रॅम – ₹86,528
१० ग्रॅम – ₹1,08,160
प्रमुख शहरांतील प्रति ग्रॅम सोन्याचे दर
शहर    24K    22K    18K
पुणे    ₹14,422    ₹13,220    ₹10,816
दिल्ली    ₹14,437    ₹13,225    ₹10,831
नागपूर    ₹14,422    ₹13,220    ₹10,816
चेन्नई    ₹14,461    ₹13,256    ₹11,035
कोलकाता    ₹14,422    ₹13,220    ₹10,816
अमरावती    ₹14,422    ₹13,220    ₹10,816
चांदीचा आजचा दर
चांदीच्या किंमतीत आज कोणताही बदल झालेला नाही. गेल्या काही दिवसांपासून चांदीचा भाव स्थिर आहे. सध्या प्रति ग्रॅम चांदीचा दर ₹235, तर १ किलो चांदीचा दर ₹2,35,000 इतका आहे. सराफा बाजार सुरू होताच हे ताजे दर नोंदविण्यात आले.

संबंधित बातम्या