हृदयरोग टाळण्यासाठी नियमित तपासणी करण्याची गरज : डॉ. निलेश तावडे

हृदयरोग टाळण्यासाठी नियमित तपासणी करण्याची गरज : डॉ. निलेश तावडे
  • Positive News
  • ऑक्टोबर 1 2025

Share on  

हृदयरोग टाळण्यासाठी नियमित तपासणी करण्याची गरज : डॉ. निलेश तावडे


नाशिक :  वयाच्या 30-35 नंतर शरीराची झीज होते. हृदयाचे आजार हे  अनुवंशिक असतात. ज्या कुटुंबात कुणाला 55 वर्षे वयाच्या अगोदर हृदयविकाराचा  झटका आला आहे त्या कुटुंबातील सदस्यांनी 30-35  वयामध्ये  नियमित तपासण्या करून घ्याव्यात  त्यामध्ये हृदयाचे पंपिंग नॉर्मल आहे किंवा नाही याची तपासणी करणे गरजेचे आहे. वयाच्या 50 नंतर  दर दोन वर्षांनी नियमित तपासणी करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन डॉ. निलेश तावडे यांनी केले .ते लोकमान्य हॉस्पिटल मध्ये जागतिक हृदय दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आहारतज्ञ क्षितिजा गायकवाड, डॉ.ओंकार गवळी,डॉ. रोहित ठाकरे ,डॉ  केतन गांधी, डॉ. आशिष बडगुजर आदी उपस्थित होते.

डॉ तावडे म्हणाले की , सध्या हृदयविकाराचे झटके येऊन कुठलीही मदत न मिळाल्यामुळे मृत्यूदर वाढलेला आहे आपल्या आजूबाजूला परिसरात जर कुणी कुणी अचानक चक्कर येऊन पडले किंवा कोसळले तर वैद्यकीय मदत मिळेपर्यंत सीपीआर कसा द्यायचा याचे प्रात्यक्षिक देखील डॉ. निलेश तावडे यांनी दाखवले. डॉ. रोहित ठाकरे  यांनी अमेरिकेत  वयाच्या 60 वर्षानंतर हृदयविकाराचे  रुग्ण  जास्त आढळतात मात्र आशिया खंडात तेच प्रमाण 40 ते 50 या वयात मध्ये दिसून येते याचे मुख्य कारण म्हणजे दैनंदिन धावपळ, व्यसने ही आहेत. त्यामुळे निरोगी आयुष्य जगण्यासाठी आणि हृदय विकार टाळण्यासाठी वेळीच काळजी घेण्याची गरज आहे असे सांगितले. डॉ. ठाकरे म्हणाले की हाताला कळ लागणे किंवा चालताना धाप लागणे अशी लक्षणे जाणवल्यास तात्काळ इसीजी,टू डी इको आदी चाचण्या करून घ्याव्यात. निरोगी हृदयासाठी  दररोज दहा हजार पावले चालावे असे सांगितले. सध्या जगातील सर्वात जास्त मृत्यू हृदयविकाराने होतात ते कमी होण्यासाठी आणि जनजागृतीसाठी  दरवर्षी २९ सप्टेंबर रोजी जागतिक आरोग्य संघटनेतर्फे  हा दिवस साजरा केला जातो. टाळण्यासाठी रक्तातील साखर, रक्तदाब नियमित तपासणे महत्वाचे आहे असे  डॉ. ठाकरे म्हणाले.

आहारतज्ञ क्षितिजा गायकवाड यांनी निरोगी हृदयासाठी आहार  कसा असावा याबद्दल  मार्गदर्शन केले. रोजच्या दैनंदिन  आहारात  सकस आहार म्हणजेच सर्व प्रकारची कडधान्ये,तृणधान्य ,फळभाज्या, हिरव्या पालेभाज्या ,कंदमुळे ,फळे,दूध आणि दुग्धजन्य पदार्थ डाळी उसळी, यांचा समावेश असावा याशिवाय तेल व तुप संदर्भात चांगले कोलेस्ट्रॉल असलेले पदार्थ जास्त खावे आणि वाईट कोलेस्ट्रॉल ची निर्मिती करणारे पदार्थ कमीत कमी खावे .एका सुदृढ व्यक्तीसाठी वीस ते पंचवीस एम एल तेल पुरेसे असते. दिवसभरासाठी तुम्ही दुसरे चरबीयुक्त पदार्थ  खात असाल तर तेलाचेlप्रमाण  अजून कमी करावे. तसेच प्रोसेस्ड पदार्थ, जास्त मीठ असलेले  पदार्थ , अल्कोहोल धूम्रपान  यापासून लांब रहावे आणि नियमित सात ते आठ तास झोप घ्यावी असे सांगितले.

संबंधित बातम्या