उन्हाळ्यात प्या अशी नैसर्गिक सरबते : वाळ्याचे सरबत 

उन्हाळ्यात प्या अशी नैसर्गिक सरबते : वाळ्याचे सरबत 
  • Positive News
  • एप्रिल 22 2025

Share on  

उन्हाळ्यात प्या अशी नैसर्गिक सरबते : वाळ्याचे सरबत 

भाग 16

उन्हाळ्यातील उष्णतेपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काही नैसर्गिक सरबते घरच्या घरी बनवून पिणे आरोग्यासाठी हितकारक ठरते कारण बाटली बंद सरबत पिल्याने फायद्यापेक्षा तोटे होण्याचे जास्त धोके असतात.

वाळ्याचे सरबत 
हे सरबत उन्हाळ्यात खूप थंड आणि आल्हाददायक असते. वाळा ही एक सुगंधी वनस्पती असून तिचे पाणी प्यायल्याने शरीराला उष्णता कमी होण्यास मदत होते. 
कृती:
अंदाजे 4 जुड्या वाळ्याची मुळे घ्या ,  तीन ते चार वेळा स्वच्छ धुऊन घ्या.
1  लिटर पाण्यात  10-15 मिनिटे उकळवा त्यानंतर  थंड करा.
पाणी थंड झाल्यावर ते गाळून घ्या. आणि काचेच्या बाटलीत भरून ठेवा. आम्ही तेवढे पाणी घेऊन
चवीनुसार साखर किंवा मध टाका .
तुम्ही चवीनुसार लिंबू आणि मीठ देखील टाकू शकता. थोडे बर्फ घालून थंडगार वाळा सरबत प्यायला द्या. बाजारातील सरपताप्रमाणे याला हिरवा रंग येणार नाही. कारण त्यात फूड कलर ऍड केलेला असतो. 

जर तुम्हाला हिरवे सिरप तयार करायचे असेल तर चार जुड्या स्वच्छ धुतलेल्या वाळ्याच्या मुळ्या. एक लिटर पाणी, 200 ग्रॅम साखर एकत्र करून वर झाकण ठेवा. मंद गॅसवर अर्धा तास शिजवून घ्या. थंड झाले की गाळून घ्या आणि या सिरपमध्ये हिरव्या रंगाचा फूड कलर थोडासा मिक्स करा. आता हे सिरप तुम्ही सरबत बनवण्यासाठी वापरू शकता.

वाळ्याचे फायदे:
उष्णता कमी करते, शरीराला ताकद देते, कफ आणि पित्त कमी करते, उन्हाळ्यात थंडीचा अनुभव देतो. 

अंजली जाधव,
 ठाणे

संबंधित बातम्या