उन्हाळ्यात प्या अशी नैसर्गिक सरबते : चिंचेचे सरबत

उन्हाळ्यात प्या अशी नैसर्गिक सरबते : चिंचेचे सरबत
  • Positive News
  • एप्रिल 8 2025

Share on  

उन्हाळ्यात प्या अशी नैसर्गिक सरबते
भाग 5
उन्हाळ्यातील उष्णतेपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काही नैसर्गिक सरबते घरच्या घरी बनवून पिणे आरोग्यासाठी हितकारक ठरते कारण बाटली बंद सरबत पिल्याने फायद्यापेक्षा तोटे होण्याचे जास्त धोके असतात.

चिंचेचे सरबत 
राजस्थान मध्ये प्रचलित असलेले चिंचेचे सरबत उष्णतेपासून बचाव करण्यासाठी उपयुक्त ठरते.

कृती:

चिंच आणि पाणी एकत्र करून दोन तास भिजत ठेवा नंतर बोटांनी कुस्करून मिश्रण चाळणीवरून गाळून घ्या त्यात चवीप्रमाणे गुळ , जिरेपूड , काळे मीठ, बर्फ आणि पाणी घालून चांगले मिसळा. थंड सरबत प्यायला द्या. 
फायदे:
चिंच रेचक असल्यामुळे हे सरबत बद्धकोष्ठतेच्या पेशंटला उपयोगी पडते.
चिंचेमधील अँटिऑक्सिडंट रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात आणि प्रतिकारशक्ती वाढवतात
 कमी प्रमाणात गुळ घालून केलेले चिंचेचे सरबत रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करते त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी उपयुक्त आहे.
पोट साफ करण्याचा गुणधर्म असल्यामुळे वजन कमी करण्यासाठी हे सरबत उपयुक्त ठरते 
पोट दुखी आणि अपचनासाठी उपयुक्त असते

डॉ अंजली जाधव ,  ठाणे 

संबंधित बातम्या