उन्हाळ्यात प्या अशी नैसर्गिक सरबते : जांभळाचे सरबत

उन्हाळ्यात प्या अशी नैसर्गिक सरबते : जांभळाचे सरबत
  • Positive News
  • एप्रिल 9 2025

Share on  

उन्हाळ्यात प्या अशी नैसर्गिक सरबते
भाग 6
उन्हाळ्यातील उष्णतेपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काही नैसर्गिक सरबते घरच्या घरी बनवून पिणे आरोग्यासाठी हितकारक ठरते कारण पाटलीबंद सरबत दिल्याने पायाभूत तोटे होण्याचे जास्त धोके असतात.

जांभळाचे सरबत
उन्हाळ्यामध्ये ताजी जांभळे उपलब्ध असतात. अतिशय सुंदर रंगाचे दिसणारे हे सरबत चवीलाही तेवढेच उत्तम लागते.
कृती:
ताजी जांभूळ घ्या आणि स्वच्छ धुवून घ्या. थोडे पाणी टाकून मऊ होईपर्यंत शिजवून घ्या . थंड झाले की बिया काढून चाळणीवर टाकून गाळून घ्या. गरामध्ये अजून थोडे पाणी टाकून गाळून घ्या .
 चवीनुसार साखर , मीठ आणि आवडत असल्यास लिंबाचा रस घाला. 
मिश्रण थंड करण्यासाठी बर्फ घाला आणि स्वाद घ्या एक वेगळ्या सरबताचा.

जांभळाच्या सरबताचे फायदे:
जांभळाचा कशाय रस म्हणजेच तुरट चव पित्त आणि कफ दोष नाहीसा करते. परंतु जास्त प्रमाणात सेवन केल्यास वातदोष वाढवते.
आकुंचनशील आणि शोषक गुणधर्मामुळे अतिसार आणि जास्त घाम येणे यामध्ये उपयुक्त ठरतो.

मधुमेहासाठी फायदेशीर:
जांभूळ रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते.पण इथे सरबत बिनसाखरेचे, फक्त मीठ घालून तयार करावे.

पचनक्रिया सुधारते:
जांभूळ पचनक्रिया सुधारण्यास मदत करते.

रोगप्रतिकारशक्ती वाढवते:

जांभूळमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे रोगप्रतिकारशक्ती वाढवतात.

त्वचेसाठी फायदेशीर:
जांभूळ त्वचेसाठी चांगले असते, कारण ते त्वचेमध्ये कोलेजन तयार करण्यास मदत करते.

डॉ. अंजली जाधव ,ठाणे 

संबंधित बातम्या