उन्हाळ्यात प्या अशी नैसर्गिक सरबते : पेरूचे सरबत

उन्हाळ्यात प्या अशी नैसर्गिक सरबते : पेरूचे सरबत
  • Positive News
  • एप्रिल 10 2025

Share on  

उन्हाळ्यात प्या अशी नैसर्गिक सरबते

भाग 7
उन्हाळ्यातील उष्णतेपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काही नैसर्गिक सरबते घरच्या घरी बनवून पिणे आरोग्यासाठी हितकारक ठरते कारण बाटलीबंद सरबत पिल्यामुळे फायद्यापेक्षा तोटे होण्याचे जास्त धोके असतात.
पेरूचे सरबत
 उन्हाळ्यात पेरू लवकर पिकतात आणि पिकलेल्या पेरूचे काय करावे हे समजत नाही परंतु अशा मऊ पेरूंचे रुचकर , उत्तम सरबत बनते आणि ते आरोग्यासाठी हितकारक असते.

कृती: 
पिकलेले मऊ पेरू स्वच्छ धुऊन घ्यावेत . त्याचे बारीक तुकडे करून मिक्सरमध्ये हलके हलके फिरवावे, बिया फुटणार नाहीत याची काळजी घ्यावी. नंतर चाळणीवर टाकून गर  बाजूला करून घ्यावा. जेवढा गर असेल त्याच्या निम्मी साखर मिसळून मंद गॅसवर जरा वेळ शिजवून घ्यावे. थंड झाल्यावर त्यात चवीप्रमाणे लिंबूरस व मीठ मिक्स करावे. या सरबतामध्ये जरुरीप्रमाणे थंड पाणी मिक्स करून त्याचे सरबत बनवावे

पेरू सरबताचे फायदे:

पेरूमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट्स असतात, जे रोगप्रतिकारशक्ती वाढवतात आणि आजार दूर ठेवतात. 

पेरू फायबरचा चांगला स्रोत आहे, जो पचनशक्ती सुधारतो आणि बद्धकोष्ठता दूर करतो. 

पेरूमध्ये जास्त फायबर आणि लो ग्लायसेमिक इंडेक्स असतो, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते, परंतु मधुमेही व्यक्तीसाठी बिना साखरेचे , मीठ व लिंबू घालून सरबत करावे

पेरूमध्ये व्हिटॅमिन बी3 आणि बी6 असते, जे रक्तभिसरण सुधारण्यास मदत करते आणि स्मरणशक्ती वाढवते. 

उन्हाळ्यात पेरूचे सरबत प्यायल्याने शरीराला थंडावा मिळतो.

डॉ . अंजली जाधव 

संबंधित बातम्या