उन्हाळ्यात प्या अशी नैसर्गिक सरबते ; बडीशेप सरबत
भाग 9
उन्हाळ्यातील उष्णतेपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काही नैसर्गिक सरबते घरच्या घरी बनवून पिणे आरोग्यासाठी हितकारण ठरते कारण बाटलीबंद सरबत पिल्यामुळे फायद्या पेक्षा तोटे होण्याचे जास्त धोके असतात.
बडीशेप सरबत
गुजरात मध्ये खास करून प्रसिद्ध असलेले वरीयाली म्हणजेच बडीशेप चे सरबत चवीला उत्तम लागते आणि आरोग्यदायी पण आहे
कृती:
1वाटी बडीशेप, एक वाटी खडी साखर, 5 सोललेले हिरवे वेलदोडे, चवीपुरते काळे मीठ हे सगळं साहित्य मिक्सर मधून बारीक करून हे मिश्रण काचेच्या बरणीत साठवून ठेवा . सरबत करायचा असेल त्यावेळी एक ग्लास मध्ये एक चमचा आधीच भिजवून घेतलेला सब्जा, थोडी पुदिना पाने, एक चमचा वरील तयार केलेले बडीशेप प्रिमिक्स आणि लिंबू पिळून मिक्स करणे.
थंड बर्फाचें तुकडे टाकून वरून पुदिना पानांची सजावट करून थंडगार बडीशेप सरबत सर्व्ह करणे.
फायदे:
बडीशेप प्रकृतीने थंड असते त्यामुळे हे सरबत उन्हाळ्यात शरीराला थंडावा मिळवून देते तसेच शरीरातील उष्णता कमी करते.
बडीशेप की पाचक आहे त्यामुळे गॅस, पोटदुखी, अपचन अशा समस्या दूर करते.
बडीशेप बुद्धी साठी पण चांगली असते त्यामुळे एकाग्रता वाढते.
सब्जा प्रकृतीने थंड असतो तसेच त्यामध्ये फायबर जास्त असते त्यामुळे थंडावा मिळण्यासाठी आणि पोट साफ होण्यासाठी मदत होते.
पुदिना पाचक असतो त्यामुळे पचन संस्था निरोगी राहते
वेलदोडे पचनसंस्थेतील अल्सर बरे करण्यास मदत करतात.
डॉ अंजली जाधव, ठाणे